कंपनी भाग १०
कंपनी: भाग ९ वरून पूढे चालू:
बाहेरून फिरून आल्यावर धाकट्या भावाने आईसाहेबाशी व मोठ्या भावाशी सल्लामसलत करून काही निर्णय घेतले. दोघही धाकट्या ंंमुलाच्या विचाराशी सहमत नव्हते. पण तरीही, त्यांनी त्याच्या इच्छेसाठी तयार झाले. विचारपूर्वक व अभ्यासपूर्वक सर्व टेंडर पेपर तयार केले. पण कंत्राट कुणाच्या नावावर घ्यावे? हे प्रश्न चिन्ह होते. वडिल नुकतेच वारले होते, व गाव तसा मागासलेलाच होता. आई साहेबांच्या नावावर घेता येत नव्हते. वडिल भाउ पाटील होता. म्हणजे सरकारी माणूस व वहिनी सहेब पाटलीन, तेव्हा त्यांच्याही नावे घेवू शकत नव्हते. जावई चे नाव नोकरी मिळण्याच्या यादीत होते.(जावयाला दिली नाही तर मुलीला) त्यामुळे ताईसाहेबांचे नावही रद्द झाले होते. स्वत: व मुल व पत्नी हे कित्येक वर्ष मुंबईत रहात होते. भिवाचा ंंमुलगा स्वत: नोकरीच्या यादीत होता. व तो स्वत:साठी छोटी मोठी कंत्राट भावाच्या नावे घेवू इच्छित होता. मग टेंडर पेपर कुणाच्या नावे सादर करणार? अचानक त्याला भावाची १० वर्षाची लहान मुलगी आठवली, मुंबईहून येताना त्याने तिच्यासाठी छानसा फ्राँक आणला होता.पण ती वयाने छोटी होती. त्यामुळे तिची आई तिची काळजी वाहक आहे, असे दाखवून तिच्या नावे टेंडर भरून वहिनी साहेबांचे पेपर जोडून स्वत:चे शिक्षण,अनुभव कागदपत्र जोडले. व टेंडर कमीत कमी किंमत लावून भरले. कंत्राट खूप मोठे होते, त्यामुळे नोकरी सोडायला लागली, तर गावीच स्थायीक होण्याचे स्वप्न धाकट्या मुलाचे होते......
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा