पूर्नजन्म भाग १०


पूर्नजन्म भाग ९ वरून सुरू

तिचं नाव नंदीनी होतं  ती भावांचीअतिशय लाडकी होती. अतिशय लाडात पण कडक वातावरणात वाढलेली, त्यांच्या बहिणीने खरतर तिन्ही भावांचा विश्वासघात केला होता, ती त्यांच्या वंश परंपरागत विरोधक आलेल्या ,खानदानी वैर असलेल्या , घरातील मुलाच्या  प्रेमात पडली होती. तिच्या मर्जीखातर त्यांना तिचे लग्न जयंता बरोबर करून द्यावे लागले होते, पण त्यांना हेही ठावूक होते, की त्या घरात ती सुखी राहू शकत नाही. 

जयंता नि नंदीनी  गाडीतून खाली उतरले, सर्वजण त्यांना ओवाळायला नी स्वागताला जमले, त्यांना ओवाळून झाल्यावर खांब सोडले (कापले,) गेले, व  त्यांनी घरात प्रवेश केला. आत गेल्यावर सर्वांचे लक्ष तिच्या पायातील पैंजणां कडे गेले, कारण गेले आठवडा भर जो आवाज खणखणत  होता , तो आवाज आज येत नव्हता तिला विचारलं गेल, पण  तिने असेच काहीतरी कारण सांगून टाळले, मग तिच्या उतरलेल्या व सुजलेल्या चेहर्यावरून विचारले, पण अपुर्या झोपे मुळे सांगितले, दोन्ही भावाने तिला खोलीत बोलावून आजची  भेट म्हणून घुंगरांचे कडे व बिंदी दिली, आणि बहिणीला रडू कोसळले,  तिने भावाला दुसरी अट मागे घे म्हणून विनंती केली, भावाने विचारलं म्हणजे वारंवार अपमानीत होवून तू त्या घरात रहायला का तयार झालीस? , असं कोण आहे की त्याला तू पसंत नाहीस, ?त्यावर नंदिनी काही न बोलता खोलीतून निघून गेली,  सर्वजण  पंगतीला जेवायला बसले, परत मोठ्या भावाने नवजोडप्याला काल माझ्या बहिणीचा अपमान झाला नसेल तरच  एकमेकांना तोंडात घास भरवायचे आहे, असं म्हटलं - नी भरवाभरवी थांबली, जिथे पाहुणे जेवत नाहीत. तिथे, यजमान कुठून जेवणार! जेवणे खोळंबली, तासाभराने जेवणाला स्पर्शही न करता पंगत उठली,जयंताला गंभीर परीस्थिती ची जाणीव झाली, त्याने घरी निघायची नंदीनीला विनंती केली, सर्वाना पूजेचे आमंत्रण दिले, पण वातावरण निवळले नाही, न जेवता तूम्ही घरी जावू शकत नाही, आणि लग्नाची अट मोडली असेल तर नवरी मुलगी तूमच्या बरोबर घरी येवू शकत नाही. जयंताची बाजू घ्यायला कुणीही नव्हते,नंदीनीकडे त्याने रागाने पाहिले तिला लग्न मोडायचे होते तर ती मला घेवून इथे कशाला आली? पण नंदीनीने भावाला आम्ही माडीवर थोडं विश्रांतीसाठी थांबतो, सांगितले, ती जयंताला घेवून माडीवर गेली,  घरातून परत दिलेले घुंगरू वाले कडे व बिंदी दाखवली, मी काहीही सांगितलेले नाही, त्यांनीच अनुमान काढले, आपण जेवून लगेच पूजेचे कारण सांगून इथून निघून जावूयात, नाहीतर तूला इथे घरजावई म्हणून रहावे, लागेल, आणि मला सासर मिळणार नाही, मी परत इथे कधीच येणार नाही. 

खाली आम्हाला, जेवण वरती माडीवर पाठवा, म्हणून निरोप पाठविला, तिची मैत्रिण कम कामवाली, मुलगी जेवणाची ताटे घेवून आली,  दोघांनी एकमेकांना घास भरवले,जेवण संपविले. बराच वेळ निघून गेला होता, संध्याकाळ टळून चालली होती. 

क्रमश:

वर्षा प्र पाटील. ©®

उरण, नवी मुंबई. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4