मनाचे कांगोरे

 केव्हा केव्हा, आपल्याच

माणसाच्या अस्तित्वाची आपण 

दखल घेत नाही, पुर्ण दुर्लक्षित करतो, जाणीवपूर्वक! 

पण तो जाताच, ते रित पण खायला उठतं, 

जसं की रस्त्याच्या मधोमध असलेलं,  भलमोठ

वडाच 🌳झाड,! जाता येता त्याच्या फांद्या सतत  आपल्याला

टोचत असतात, त्याची मूळ🌱 स्पीड ब्रेकर सारखी 

आडवी येत असतात, त्याची सतत आपल्याला अडचण

वाटते, पण जेव्हा ते झाड 🌳 तोडलं जात, तेव्हा तो रस्ता भकास, उजाड, रखरखीत, होतो, त्यांनी दिलेल्या सावलीची, वार्याच्या झुळूकीची, जाणीव अनाहूत पणे मनाला होते, मन त्या शितल, शांत सावलीची आठवण काढून दुखावत, बावरत,मनाला आपराध्यासारखं वाटतं ज्याच अस्तित्वच आपल्याला नको असतं, ते दुरावल्याचं दु:ख कशाला?  पण हे ंंमनाचे कांगोरे आहेत, ते उलगडत नाहीत. एखाद्या निळ्याशार डोहातील पाण्यासारखे खोल खोल, वरती कितीही उजेड असला तरी आत गुडूप अंधार काळोख! 


वर्षा प्र पाटील. ©®

नवी मुंबई, उरण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4