पालेभाजी
पालक, मुळा ,मेथी
आले मोठ्या थाटात,
बसले ऐटीत ताटात,
चिरताना कांदा, नी
मिरचीचे तुकडे, पाहून
हसले हळूच गालात !
चढली कढई शेगडीवर
ओतले तेल कढईत
सरली मिरची आत
चरकन वाजला कांदा
कानात!
जिर, मिर,
हळद, हिंगाने मारल्या
उड्या भराभर !
पाण्याच्या वाडग्यात
पदर सावरत ,
हसत खेळत ,
हिंदकळले सारे!
स्वयंपाकाच्या
हतातली सुरी
पाहून सगळे बसले
धाब्यावर!
चरचर चालली सूरी ताई
रड रड रडली ,पालक बाई
खोबरे, मीठ,, सर्वाना घेवून
गडबडा लोळले, कढईभर!
ताटातील भाकरीवर
जावून पडले!
कढईतील भाजी
अशी झाली, संपन्न
खाणार्यानी दिली तृप्तीची
ढेकर!
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा