पूर्नजन्म भाग १२
पुर्नजन्म भाग ११ पासून पूढे्
तिच्या तिन्ही भावांना अटक झाली. पण वडिलांच्या ओळखीने लगेच दुसर्या दिवशी सुटका झाली. त्याच रात्री 🌙⏰ त्यांनी गावातून पळून जायचा निर्णय घेतला, त्यांच्या डाृयव्हर ने त्यांना घेवून जाण्यास नकार दिला. पण मध्यरात्री पेट्रोल भरून गाडी तयार ठेवून सर्व सामान दुसर्या गाडीत भरून पाठवण्याचे आश्वासन दिले. गाडीत तीन भावांचे परिवार व आई वडील होते, गाडी दुसर्या राज्यात पोहचण्याऐवजी दरीत कोसळली, एवढे मोठे पातक करून मनावर दडपण असताना, गाडी चालवताना गाडीवरील ताबा सुटला, म्हणून म्हटलं नियती तिला हवं तसंच करते, आमचे सर्व वैरी एकाच दिवशी गेले. त्या घरातील सर्व सामान जसेच तसंच राहीलं कुणीही त्या हवेली कडे फिरकत नाही. कुणी चोरीच्या इराद्याने ही कधी तिथे जात नाही. सरकारने, त्यातील सामानाचा लिलाव करण्याचा प्रयत्न केला. पण गाव वल्यांनी तो हाणून पाडला, हवेली व त्यातील वस्तू सरकार जमा केलेलं आहे.
लवकरच रमणचा जन्म झाला, आम्हाला आमचा जयंता परत मिळाला. रमण दिसायला लहानपणा पासूनच जयंतासारखा दिसतो, पण तो शाळेत जावू लागल्यावर लवकरच त्याला चित्र रेखाटायचा छंद लागला, जयंतासारखाच हुबेहूब तो चित्र काढायला लागला, एकदा त्याला लग्नातील फोटो 📷मिळाला, नी नवरानवरीचे त्याने उत्तम चित्र रेखाटले, नंतर, नंतर तो समुद्रावर जाताना मित्राबरबर कुणीतरी त्याला त्या हवेली जवळ पाहीले, मग मात्र आम्ही त्याला त्याच्या मामाकडे शिक्षणासाठी पाठवले, त्याने कधी कुतूहल म्हणून ही काही विचारले नाही, व आम्ही कधी त्याला सांगितले नाही. रमणचा पूर्न्जन्म झाला, हेच आम्ही मानतो,
सर्व गोष्टी मेधासाठी साफ झाल्या, काय टाळायचे, काय नाकारायचे हे तिला कळले.
आजीचा चेहरा अश्रुनी भिजला होता. पण चेहर्यावर समाधान होते, रमणला ती आपला मुलगाच मानत होती. वसंता व नंदन ही दोन्ही कुटुंबे एकत्र रहात होती. गावातील उत्सव व्यवहार व्यवस्थित चालले होते. सरकारला गावकरी त्या हवेलीच्या अस्तित्वात बद्दल नोटीसा बजावत होत्या.
सुट्टी कँन्सल करून लवकरच चौघे मुंबईला रवाना झाले. परत उत्सवाला नवस फेडायला यायचे होते, मग आत्ताच सुट्टी संपवून कसे चालेल.
समाप्त.
टीप:
वरील कथेतील, नावे, कथा किंवा पात्र ही सत्य नाहीत. असे कुठे आढळून आल्यास केवळ योगायोग समजावा.
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा