पूर्नजन्म भाग: ४
पूर्नजन्म भाग: ३ वरून पूढे चालू
सामान गाडीतून उतरवून ब्लॉक मधे नेले. रमणने गाडी पार्क केली. सर्वच प्रवासाने थकले होते. यशदा गार वार्याने झोपली होती.थोडा आराम करून दोघीही संध्याकाळच्या जेवणाच्या तयारी ला लागल्या. गप्पा करता करता शितलला मेधाने गावच्या माडी विषयी विचारले. पण तिला तितकेसे सांगता आले नाही. ती कुणा इनामदार कुटूंबाची होती. ती लोक गावात रहात नव्हती. ती गाव सोडून गेली होती.......
मेधा दुसर्या दिवशी आँफीसला गेली, येताना सगळ्यांनी प्रेमाने दिलेल्या पैशाने यशदा साठी पैजण घ्यायला गेली. फक्त घुंगरू चे पैजण बरेच महाग होते. पण तिला ते ़खूप च आवडले. तिने ते विकत घेतले. त्याच बरोबर एक अँन्टीक पिस असलेली कुंकवाची करंडी, व एक केसात माळण्यासाठी घुंगराचे फूल घेतले. तिने ते सर्व पँक करून घरी आली. तिने ते उत्साहात शीतलला दाखवले, त्यावर ती म्हणाली आपण हे दादाला दाखवायच्या आधीच तिच्या पायात घालूया, म्हणजे तिच्या पायातील घुंगरू च्या आवाजने तो लगेच ओळखेल. तिने ते मेधा कडून घेवून यशदाच्या पायात घातले. आवाजने यशदा खूपच खूश झाली. फ्रेश होवून मेधा खिडकीत शितलने दिलेला चहा पीत बसली. आणि खिडकीत पहाता पहाता भूतकाळात शिरली.......
मेधा दिसायला सुंदर होती, ५० जणांच्या गर्दीत ही उठून दिसणारी होती. सर्वांशी लगेच मैत्री करणारी होती. काँलेजच्या पहिल्याच दिवशी तिने रमणला पाहिले तो इतर मुलांहून वेगळा होता, भारदस्त होता. चार जणांची नजर वळून पाहिले असा होता. योगा योगाने तो मेधाच्या वर्गात होता. दोघांची मैत्री झाली. संपूर्ण वर्गात कुणालाही जोडी लावा सांगितले तर कुणीही डोळे मिटून दोघांची जोडी लावत असत.
एकदा सर्व वर्गातील मुलांना मेधा ने छोट्याशा पार्टी साठी घरी बोलावले, आई रमणला पाहून खूश ़झाली.मेधाला पूढे मागे असाच नवरा मिळावा असे वाटले. नंतर फक्त अभ्यासासाठी, नोट्स न्यायला भेटायला, टाईमपास म्हणून रमण वरचेवर घरी येवू लागला. मग मात्र आईने मेधाला विचारून टाकलं खरच हा फक्त तूझा मित्र आहे. की तू निवडलेला जोडीदार आहेस, त्यावर मोकळे पणाने मेधाने आईला सर्व सांगितले. पण तो मुंबई चा नसून गावचा आहे कळल्यावर आईने सर्व बाबी मेधाच्या वडिलांच्या कानावर घातल्या त्याला भेटताना त्याचे व्यक्तीमत्व पाहून सविस्तर त्याची विचारपूस केली. काँलेज संपताच दोघांना मुंबई ला नोकरी लागली. नी मेधाच्या आईच्या डोक्यावरून गावच्या काळजीचा भार उतरला. मग मेधाच्या आई वडीलांनी रमणच्या गावी जावून दोघांचे लग्न ठरवून आले. रमणच्या आई वडिलांच्या अटी कडक होत्या, त्यापैकी एक लग्न गावीच व धुमधडाक्यात व्हायला हवे. रमणच्य गावचे घर मोठे होते. व गोतावळाही खूप होता. त्यामुळे गावी मेधाकडची माणसे येणेच योग्य होते. एकूलत्या एक मुली साठी खर्च करण्यास मेधाचे आई वडिल तयार झाले. सर्व मेधाच्या मनासारखे झाले होते. दारावरची बेल वाजली नी मेधा त्या आवाजाने भानावर आली. ...
क्रमशः
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा