कंपनी :भाग ६

भाग ५ वरून पूढे सुरू




संध्याकाळी ५ वाजता बैठक सुरू होणार होती. पण कुतूहल म्हणून जागा आडवायला म्हणून ४ वाजल्यापासून गावकरी, चावडीवाले ,वस्तीवाले लोक जमू लागले , वाड्यावर गजबज दिसू लागली . बसण्यासाठी ताडपत्री आंथरली गेली. पाण्याच्या टाक्या एका कोपर्यात उभारल्या गेल्या. पोलीस जागोजागी उभे होते. गोंधळ, मारपीट, तसेच पाटलाला संरक्षण म्हणून जागेचा ताबा घेईपर्यंत कलेक्टर कडून सोय केली गेली होती. 

सर्व वरीष्ठ सदस्य खूर्चीत बसले, सरपंचाने आवेशात भाषणांला सुरूवात केली : गावात सरकारने डोंगर पोखरायला उंदीर सोडले, त्यांच्यापासून आपल्याला गाव व जमिनी वाचवायच्या आहेत , तेव्हा सर्वांनी आंदोलनास तयार रहा. सर्वांनी आवेशात होय होय म्हणून 'नारा' लावला. गावात जर जमीनी राहणार नाहीत, शेतीच राहणार नाही ,जर भातच पिकणार नाही. गुरांना चारा, पाणी नाय, डोंगर नाय, दुध नाय म्हणजे आमच्या नी जनावरांच्या तोडांतील घास काढून, आमी काय खायचं नी कसली नोकरी करायची? नी कागदाच पैक घेवून काय करायच? , नी असली नोकरी काय कामाची? आणि आमी गाववाल काय नोकरी करनार,? आमाला शेती नी गुरं राखण्यापलिकडं काय बी येत नाय, गाववाले त्वेषाने जागेवरच डोलू लागले, कुणाकडे १०ची नोट हाय का? वस्ती वरच्या लोकांना विचारले नाय बा सर्वानी उत्तर दिले. मग १०० रू ची बंडल गावतील त्याचं काय कराल,  ४० एकर पाटलाची, ४० एकर गाववाल्यांची सर्वांची मिळून नी २० एकर  वस्ती मिळून १०० एकर जमिन. त्यात पाटलाची जमिन सर्वात जास्त तेव्हा पाटील काय निर्णय घेईल तो आपन मानाचा......

आपली जमिन चारी बाजूंनी तारा ठोकून बंद केली जाईल,  फुकट मिळणारं सरपण बंद त्याऐवजी विजेची चूल नी वीज मिळलं, लोक डोळे विस्पारून, नी कान टवकारून ऐकत होते. त्याच्यात बरंचस समजण्या पलीकडले होते. तरी आता भात न पिकवता, फकस्त पैसे गावणार, पण त्याच काय करायचं? ते कळत नव्हतं त्यांचे हात शिवशिवत होते, तोडांनी काही बाही बोलत होते.हळूहळू पुटपुटत होते. सरपंचाने काहीतरीच प्रक्षोभक भाषण केले होते. वातावरण तापत होते. सरपंचाच्या भाषणांनी गावातील वातावरण बिघडेल हे पाहून सरकारी अधिकारी बोलायला उठला, त्याने त्याचे अभ्यासपूर्ण भाषण सुरू केले.... 

गावात जी कंपनी येणार आहे ती तूमच्या गावातील जमिन घेणार नसून डोंगरालगतची,जवळची जमिन घेणार आहे. त्या मोबदल्यात जमिनीला माफक दर, घरटी १ नोकरी व नोकरदारांना प्रशिक्षण, वीज, नविन शाळा ,व  गेलेली जमिन काही प्रमाणात परत मिळेल. डोंगरातील वस्ती त्या १०० एकरात मोडत असेल , तर त्यांना तिथेच काही किलोमीटर अंतर सोडून सरकार कडून घर बांधून मिळतील. उरलेल्या डोंगरावर गाववाल्यांचा व गुरांचा वावर चालू राहील. एवढेच बोलून झाल्यावर गाववाले थोडे शांत झाले. तुम्हाला मिळालेल्या पगारातून तूम्ही शहरी बाजारातून धान्य व किराणा आणू शकाल, तसेच शहरी बाजारातून धान्य आणून गावात विकण्यासाठी गावात दुकान सुरू करण्याचे लायसन्स, व परमिशन मिळेल. गावात बाजारच, प्रक्रिया केलेलं विकतचं दूध मिळेल, तुमची मुले उपाशी न रहाता शाळा शिकतील, आमच्या सारखेच अधिकारी बनतील. लोकांना साहेबाचे भाषण ऐकून धीर आला. साहेबांनी परिस्थिती हाताळली. जमावाला शांत केले. व भाषण संपवून खाली बसले. पाटील सर्व चिंताग्रस्त चेहर्यांनी ऐकत होते. अधिकारी बसल्यावर पाटील भाषणाला उभे राहिले. : काळी आई विकायची म्हणजे  जिच्या अंगाखांद्यावर वाढलो जिने पोसलं, ती विकायची. 

जमिनीचा खरे मालक आज हयात नाहीत, तेव्हा मी ह्याविषयी आईसाहेबांशी बोललो, त्याच्यांशी चर्चा केली. त्यांनीही नीट विचार करून गावचं भल होणार असेल, गाव समृद्ध होणार असेल तर आमची ना नाही आम्ही आमची  संमती दर्शवली आहे, परंतू  व्यवहारात  काही काळबेर लक्षात आलं तर सरळ आपले आंदोलन सुरू होईल .,तुर्तास सरकार काय सांगते त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत,पटलाने आपले भाषण संपवलं, बैठक संपली म्हणून जाहीर झालं. सर्वाना चहापाणी वाटण्यात आलं. माणसांची पांगापांग झाली. भिवा व निवडक माणसे आवरा आवर करू लागले......... 

क्रमश:

वर्षा प्र पाटीलं. ©®

उरण नवी मुंबई


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4