पूर्नजन्म भाग ८
पूर्नजन्म भाग :७
आजी पूढे सांगू लागली: आम्ही नाईक निंबाळकर, पण आजोबा फक्त निंबाळकर आडनाव लावत. आम्हाला चार अपत्य, १ मुलगी, ३ मुले. सर्वात मोठे रमणचे बाबा, रमण माझा सर्वात मोठा नातु त्याच्याही जन्माआगोदरची गोष्ट, निंबाळकर हे मोठ्या घराण्यचे नाव वंश परंपरेने चालत आलेले पद त्यामुळे गावात मोठा मान, दिसायला माझी चारही मुले सुंदर , मी शहरातली ह्या खेड्यात येवून पडले, घरची गरिबी, पण श्रीमंत सासर मिळाले, चारही मुलांना प्राथमिक शिक्षण संपल्यावर वडिलांकडे शिकायला ठेवले, तेवढीच वडिलांना मदत, मुलीचे मॅट्रिक पर्यत शिक्षण होताच तिचे लग्न लावून दिले. तिचे नाव निर्मला लाडाने तिला आम्ही नमु म्हणत तिच्या पाठोपाठ लगेच २ महिन्यात वसंताचे लग्न केले. म्हणजे रमण च्या बाबाचे, ३रा जयंता अतिशय सालस, गुणी त्याला चित्र रेखायचे वेड , निर्सगाची चित्र काढण्यासाठी तो समुदकाठी, डोंगरावर, देवळात, तासनतास बसत असे, माणसांचे ही चित्र तो हुबेहूब काढी. त्यानंतरचा नंदन दोंघांची खिल्लारी जोडी, जिथे जातील तिथे, एकत्र, तिघांनाही शहरात नोकर्या लागल्या, पण वडिलांची एकच अट गावचे पद जावू द्यायचे नाही. नुसत्या घराणाशाहीवर काही होत नाही. गावावर वर्चस्व पाहीजे, मी पदाचा राजीनामा देईन तेव्हा मोठ्याला पद सांभाळण्यासाठी नोकरी सोडून 🚶💨 गावी यावे लागेल. वडिलोपार्जित धन घर सांभाळण्यासाठी आहेच. नियतीला ही तेच मान्य होत बहुतेक कारण इनामदार, व निंबाळकर घराण्यात कायम पदावरून वैर.......
नंदनचा पाय 👣पठारावरून उतरताना घसरला, हाड मोडले, आणि तो घरात बसला, जयंता एकटाच पठारावरील देवळाचे चित्र रेखाटण्यासाठी जात असे तीही तिथे दररोज संध्याकाळी तिच्या मैत्रिणी सोबत देवदर्शनासाठी जाई, दोघांचे सुत केव्हा जमले ते कळलेच नाही. तासनंतास तो तिचे चित्र काढे, तिचे वेगवेगळ्या मुडचे, वेगवेगळ्या शैलीतले,.... ती होती ही तशीच! लांब सुंदर केस, केतकीचा रंग, हरणाचा डोळे, नी चाफेकळी नाक, त्याहुन मृदू कोमल आवाज, सार्या भावात सश्यासारखी रहायची पण प्रेम करायला घाबरली नाही. माझा जयंता ही होता तसाच लोभस पण दोन्ही घराण्याला हे लग्न मान्य नव्हते . कारण पदावरून कायम वाद होते, अशात जयंता ने पद कायम आपल्या घराण्याकडे रहावे, म्हणून ही चाल चालली असे त्याच्यावर आरोप होते, दोन्ही घरात खूप बवाल मच गया, पण मुलीचा मोठा भाउ तयार झाला, दोंघाचे लग्न लावून द्यायला त्यात त्याची कोणती चाल होती ठावूक नाही. पण त्याच्या चाली प्रमाणे खूप सार्या घटना घडल्या, पण नियती कधी एकाची बाजू घेत नाही. ती तिला हवे तसे वागते. लग्नात भावाने काही अटी घातल्या. .......
आजीला बोलताना धाप लागत होती. हात, ओठ थरथरत होते, डोळे पाणावले होते. मेधाने मध्येच घसा कोरडा पडला असेल म्हणून आजीच्या ओठाला पाण्याचा पेला लावला. तिने हळूहळू दोन घोट पाणी प्याली. नजर कुठे तरी शुन्यात लावून त्या घटना नजरे समोर आणीत होती. जणू ती पुन्हा तो काळ जगत होती. सर्वत्र शांतता होती प्रत्येक जण आजी पूढे काय सांगते ते गंभीर होवून ऐकत होते......
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
ुाुुाुाुुुाुुाुाुुाुुाुाुुुाुुाुाुुाुाुुुाुुाुाुुाुुाुाुुुाुुुाुुाुाुुुाुुाुाुुाुुाुाुुुाुुुाुुाुाुुुाुुाुाुुाुुाुाुुुाुुुाुुाुाुुुाुुाुाुुाुुाुाुुुाुुुाुुाुाुुुाुुाुाुुाुुाुाुुुाुुुाुुाुाुुुाुुाुाुुाुुाुाु

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा