पूर्नजन्म भाग:६


र्नजन्म भाग ५ वरून चालू

असाच सतत अबोला खूप दिवस चालू राहीला, तर चांगला हसता खेळता संसार उजाडेल हे शितलला समजून चुकले.  तिने  मेधाला परत आपण गावी जावून आराम करून येवूयात का? मनातील मळभ माणसात मिसळून निघून जाईल. म्हणून  विचारले. दुसर्या दिवशी मेधाने चांगली २ महिन्यांची सिक लिव टाकली. परत १ दोन महिन्यांची सामानाची बांधाबाध केली. दोघींनी आराम बसने गावी जायचा निर्णय घेतला. घुंगरूच्या आवाज बंद झाल्यापासून, रमणची डोके दुखी बंद झाली होती. अबोला खेरीज घरात त्याला काही वावगे दिसत नव्हतं. तरी नोकरी सोडायच्या नादाने तिने अशी भरमसाठ सुट्टी घेतली असावी, असा त्याने तर्क केला. कामावरील ड्रायव्हर ची सोय करून त्याने त्याच्या स्वत:च्या गाडीने तिंघींना गावी पाठवले. फालतु कारणा साठी त्याच्या जवळ सुट्ट्या नव्हत्या............ 

गावी सर्वाना परत तीघीच आल्याने आश्चर्य वाटले ,सासूनी खूप खोदून विचारले, पण दोघींनी काहीही कारण सांगितले नाही. मात्र सर्व घरातील काम आटपून त्या दोघी दररोज समुद्रावर फिरायला जात. एक दिवस मनाचा हिय्या करून मेधा शितलला घेवून त्या हवेलीच्या जागेत शिरली. समोर विस्तृत जागा होती. आजूबाजूच्या झाडांपासून वाळका  पाला पाचोळा पडलेला होता. पाय ठेवताच पाला चरकन वाजत होता. माडी दोन मजली हाेती तिला चढून जायला ७ उंच पायर्या होत्या. तिला लागूनच ९०°चा कोन करून  बैठे घर होत. त्यामुळे ते खूपच मोठं होतं. दरवाज्याची टाळी गंजलेली होती. आजूबाजूच्या 🌲🌲🌳🌴झाडाचा पालापाचाळ्याने कौले झाकून गेली होती. बाहेरील लाद्या उखाडल्या गेल्या होत्या, भिंतीचे रंग साफ उतरून  पाण्याचे ओघळ दिसत होते, जागोजागी मातीचे पोपडे निघून पार आतपर्यंत दगड विटा नी वाळू दिसत होती. घर बाहेरून पडिक वाटत असले तरी भिंतींची पडझड झाली नव्हती. पण विटलेल्या पार जीर्ण झालेल्या कपड्यासारखे विद्रुप रूप घराचे झाले होते. मागच्या  बाजूने एखादे दार उघडे मिळते का ते पहाण्यासाठी मेधा मागच्या बाजूला गेली, बैठ्या घराच्या बाजूचे खिडकीचे तावदान तुटल होते. पायातील चप्पल काढून घराचा पाया व भिंत ह्यांच्या कपारीत पाय 👣ठेवून मेधा खिडकीतून डोकावली. आत उंची फर्निचर, उंची वस्तू, मांडण्यात आले होते, तिथेच भिंतीवर काळविटाचे तोंड भव्य शिंगासकट अडकविले होते, ते फारच भेसूर दिसत होते.  शितल सारखी मेधाला घरी चल आपल्याला कोणी इथे पाहिले तर अनर्थ ओढवेल. म्हणून सांगत होती. मेधाच्या  तळहाताला, कपाळावर घाम सुटू लागला, तिने धपकन जमिनीवर उडी मारली. तिथे पडलेली सुकी काटकी मेधाच्या पायात चरकन घुसली तिच्या पायातूम रक्त वाहू लागले, लगेचच शितलने त्या जखमेेेवर माती टाकली. व   ओढणीची चिंधी फाडून जखम बांधली, तिला चप्पल घालून चालता येईना, ती हातात चप्पल घेवून लंगडत चालू लागली. दिवे लागणीची वेळ झाली होती. रमणची आई तुळशीत, देवाजवळ अंगणात संध्याकाळचा दिवा लावत होती. पायाला लागल्यामुळे मेधा  घरातील कामात मदत 😌 न करता आजे सासुबाई जवळ बसून गप्पा मारीत होती. तिला त्या माडी विषयीच रहस्य आजीला विचारायची उत्सुकता होती,. पण कुणी ऐकल तर म्हणून घाबरत होती. म्हणून, इतर गप्पा मारत बसली.  रात्री झोपताना सोबत म्हणून शितल मेधाच्या ़खोलीत झोपत असे, व यशदा मेधाच्या पायाला लागले , म्हणून आजी जवळ ़झोपली. 

रात्री शितलला कुणीतरी कण्हत असल्याचा आवाज आला, जागे होवून पहाते तर मेधा झोपेत कण्हत होती. हवेलीचे  काही स्वप्न पडले असेल  व घाबरली असेल वाटून तिने तिला उठवण्यासाठी मेधाच्या अंगाला हात लावला,  तिचे सर्व अंग तापाने फणफणत होते. तिला उठवून पाणी पिण्यासाठी दिले, औषधाची गोळी दिली. डोक्यावर पाण्याच्या घड्या घातल्या. शितल एवढ्या सकाळी स्वयंपाक घरात  सारख्या फेर्यां कशाला मारते हे पाहून सासुही उठली......... 

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4