पूर्नजन्म भाग:२
वीच्या उत्सवाचा आदल्या दिवशी, रमण, शितल, यशदा, आणि मेधा गावी आले, गाडीतून सामान उतरवले, १ वर्षानंतर येतोय म्हटल्यावर सर्वांसाठी भेटवस्तू उत्सवाचे सामान, आणि चौघांचे सामान एवढ सगळ्या सामानाच्या पिशव्या शितलने खोलीत नेवून ठेवल्या.व ताई मी घरी जावून आईला भेटून परत उद्याची तयारी करायला येते. सांगून तिच्या घरी गेली. यशदाच पाउल पहिल्यांदाच ह्या घराला लागत होते. तिची दृष्ट काढून, तिच्यावरून भाकर तुकडा ओवाळून टाकला. सुनेच्या हातातून सासुने मुलगी घेतली. व सर्वजण यशदा यशदा करत सभोवताली गोळा झाले. मेधा सर्वां मोठांच्या पाया पडली. व सर्वांचे हालचाल विचारण्यात मग्न झाली. ती दिसायला खूपच सुंदर होती. पण बोलायला ही लाघवी होती. तिचं माहेरच कुटूंब लहान असलं तरी सासरचा गोतावळा मोठा होता. आणि उत्सवासाठी सगळेच जमले होते. चहापाणी, जेवण, आराम करून उद्याच्या प्रसादाची(महाभोग) तयारी पूजा, होम सजावट, ह्यात सारी रात्र गेली. पहाटे उठून सडा, रांगोळी होमाची तयारी करून , पूजेला अर्थात रमण व मेधा नवीन जोडपं बसले. त्यानंतर होम हवन गाव जेवणावळ त्यांच आगत, स्वागत, तीर्थ प्रसाद ह्यात सारं घर सामील झालं होतं. शितल व इतर घरचे यशदा ची उत्तम काळजी घेत होते. इतकी ंमाणसे, लगबग त्या लहानगी ला देखील सूखावून गेली होती. रमणची आजीह अजून ह्या घरात होती. त्यामुळे मोठ्यांचे आशिर्वाद घरावर होतेच!
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण , नवी मुंबई
,🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
ंोंोंोंंोंोंोंोंोंोंंोंोंोंोंोंोंंोंोंोंोंोंोंंोंों

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा