उंची सामान

 अगदी जूने हिंदी ,मराठी सिनेमा पाहिलेत तर एक गोष्ट लगेच लक्षात येते. की त्या पिश्चर मधील  हिरोहिरोईन , श्रीमंत लोक, महागडे उंची कपडे, महागडया  गाड्या, बंगले, महागडी चप्पल  महागडी सेंट इत्यादी वापरत असत, म्हणजेच पूर्वीच्या काळी ही फॅशन होती. रुबाबात रहाणं होत , अगदी पूर्वीचा काळ घेतला तर असे लक्षात येत की तेव्हा आभूषणांनी स्वताला सुशोभित केले जायचं,  हे सर्व आपण सुंदर दिसण्यासाठी सुखासीन जिवन जगण्यासाठी करतो व  सर्वाना तसं जिवन जगण्याची आस निर्माण होते. ते योग्यच आहे पण एक अशी गोष्ट आहे की, आपण ह्य गोष्टी तरूणपणी वापरतो, तेव्हा आवड आणि तारूण्यात असलेली उर्मी आपल्याला आवडलेली गोष्ट आपल्याकडे हवीच हे विचार , आपल्याला खरेदी करण्यापासून रोखू शकत नाही. दुसरं म्हणजे आपल्याला भविष्यकाळ माहीत नसतो. तेव्हा आपल्याला आवडेल ते आत्ताच लगेच मिळाल पाहीजे ही वृत्ती, मग ते कसही कर्ज काढून, चोरून किंवा स्वता कमवून ,वडिलोपार्जित संपत्तीतून....

तारूण्याचा जोश संपला की काहींना आपण कमावलेली संपती केलेला खोटेपणा खूपायला लागतो, पश्चाताप करावासा वाटतो. तर काहींना प्रायश्चित करावेसे वाटते. मग ते त्यावर उपायही शोधतात. पण काही दांभिक असतात, ते आपण केलयं तेच योग्य आहे मानतात. पण सर्वसाधारण विचार केला तर आपण हे कशासाठी करतो. चारदोन नश्वर वस्तू मिळवण्यासाठी खोट्या दुनियेत मोठेपणाने वावरण्यासाठी, सुंदर दिसण्यासाठी, ज्या देहाला कष्ट करून सुंदर बनवायचे ,त्या शरीराला सुंदर बनवण्यासाठी सुंदर अलंकाराने, कपड्याने, अनेक चीजवस्तू सजवून सुंदर बनवू इच्छितो, त्या वस्तू नश्वर आहेत तसा आपला देह ह नश्वर आहे. पण आपलं मन हे मानायला तयार नाही त्याला आपल्या ला  हवं तसंच आपलं शरीर ठेवायचं असतं म्हणजे च आपल्या शरीर आपल्या मनाच्या आधीन असतं. 

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई

9819406813


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4