मका


 मका: 

१)मक्यात व्हिटामिन ' ए' आणि बिटा कॅरोटीन असते. त्यामुळे दृष्टी सुधारते. 

मक्यात असलेले अँन्टीआँक्सीडंट लॅसीन, आणि जैक्सेन्थिन डोळ्यातील नजर वाचवण्याचे काम करतात. 

२) मक्यात मँग्निशिअम, आणि लोह (आयन )असते, त्यामुळे हाडांना मजबूती येते.ह्याव्यतिरिक्त झिंक आणि फाँस्फरसअसते. त्यामुळे हाडासंबधी रोग दूर होतात. आर्थराईटीस, आणि आँस्टियोपोरोसिस या पासून संरक्षण होते. 

३) मक्याच कणीस खाल्याने दात मजबूत होतात. 

४) मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. दमल्यासारखे वाटत असेल तर आळस येत असेल तर मका खावा उत्साह येतो. 

५) व्हिटॅमिन बी काँम्प्लेक्स पचन संस्था सुधारते. 

मक्यात भरपूर फायबर्स असतात, त्यामुळे अॅसिडिटी, बद्धकोष्ठता ह्या सारख्या पोटाच्या समस्या दूर होतात. पोट स्वच्छ राहते. 

६) रोग प्रतिकार शक्ती वाढते. 

७) मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. 

८) मक्यात वात आणि पित्त कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यामुळे मका उकडताना त्यात हळद व मीठ घालून खाल्यास फायदेशीर ठरते. 

९) मक्यात असलेल्या फाँलिक अँसिड मूळे कर्करोगाचे धोका कमी होतो. 

१०) मक्यात अँन्टीआँक्सीडंट असतात, त्यामुळे मका खाल्याने शरीरातील अँन्टीआँक्सीडंट ५०℅वाढतात.

११) मक्यात असलेल्या बायोफ्लोनाँइड्स, कँराटीनाँइड्स, आणि फायबर्स मुळे शरीरातील  कोलेस्टेरॉल कमी होते व ह्याचे आरोग्य सुधारते. 

१२) सर्दी झाल्यास मक्याच्या कणसाचे दोन भाग करून हुंगल्यास आराम मिळतो. 

१३), अँनेमिया /रक्ताची कमतरता नियमित मका खाल्याने भरून निघते. 

१४) कावीळ/लिटरचा विकार यावरही मका उपयोगी आहे. 

१५) मका त्वचा व केसांचे स्वास्थ्य देखील योग्य राखते.

 १६) ब्लू काँर्नने (काँर्न चे वेगवेगळे प्रकार आहेत) शरीरातील इन्सुलिन ची मात्रा वाढवता येते. 

१७) मक्यात  व्हिटॅमिन'इ'असल्यामुळे अल्जाइमर आजारात ही उपयोगात येते. 

१८) मक्यात असलेल्या फायबर कँल्शियम, लोह, फाँलिक अँसिड, व्हिटामिन सी, डी, ए, बी वजन नियंत्रण करण्यास सहाय्यक  ठरतात. 

१९) मक्यावर असलेल्या रेशमी केसांच्या रसाच्या सहाय्याने वजन नियंत्रित करता येते.  मक्याच्या अतिसेवनाने काही तोटे होतात. :

१) अधिक फायबर असल्याने पोटात दुखणे, पोट फुगणे. 

२) अतिसेवनाने पेलाग्रा(व्हिटँमिन बी ३ ची कमतरता) उत्पन्न होवू शकतो. 

३) पेलाग्रा मध्ये त्वचा, दात, भ्रमिष्ट अवस्था होवू शकते. 

४) मक्यातील ग्लुटेन मुळे स्किन एलर्जी होवू शकते. 

(माहीती संग्रहीत) 


वर्षा प्र. पाटील ©®

उरण नवी मुंबई

9819406813


Eat Healthy, stay Healthy

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4