तांबडी माती भाग :५
भाग ४ वरून पूढे चालू
पाटील रग्याला म्हणाला पारावर मस्त्या करून शरीर तर मस्त कमावलसं, दररोज काम करून ते पिळदार ही होईल. तर येत्या जत्रेत कुस्ती लढवशील? पाटील काय बोलतोय त्याचा क्षणभर अर्थ ही रग्याच्या डोक्यात गेला नाही. त्याने तोंडात टाकलेल्या घासाचा त्याला जोरदार ठसका बसला., पाटील मध्येच अरे! असा घाबरू नकोस तूला नसेल जमणार तर नाही सांग मला राग नाही येणार! पाटलाला शर्यतीचा नी कुस्तीच भारी येड पण आपल्याला असं काही पाटील विचारेल असं रग्याला वाटलं नव्हतं .
तुमचा माझ्यावर इस्वासअसेल तर घेईन मी कुस्तीच्या सामन्यात भाग, रग्या उतरला,
पाटलांन आपलं बोलणं सुरू ठेवलं सकाळ संध्याकाळ चरवी भर दूध, नी दोन जेवणात कोंबड्याच्या रस्याचा रतीब . हे बोलत असताना रग्यानं जेवण संपवून हात धुवून आला. पाटलांन आपल्या व्यायाम शाळेची चावी रग्याच्या हातात दिली.
व्यायाम शाळेत डोंगरावरची तांबडी मती टाकून आखाडा तयार केला गेला होता.
सकाळी चार वाजता उठणारा रग्या कामात नाहीतर व्यायाम शाळेत व्यग्र असे. चरवी भर दूध पिताना त्याला अपराध्यासारख वाटे. पण पाटलाचा विश्वास आठवून तो शांत होई.
थोड्याच दिवसात रग्याच्या हे अंगवळणी पडलं आधीच अंगापिंडाने मजबूत रग्या तेलाचा मालीश आणि मजबूत खूराकात त्याच शरीर चांगलच पिळदार दिसू लागलं , जसा रग्या कुस्तीसाठी तयार झाला होता, तशीचं दोन्ही खोंड शर्यतीसाठी तयार झाली होती. बाजारात दिवसातून ३ फेर्या मजबूत चारा पेंड, कडबा, तेल नी रग्या न घेतलेली मेहनत. प्रत्येकजण जत्रेची वाट पहात होता.महिनाभर आधीपासून कुस्तीची नी शर्यतीची जाहीरात फलकावर लावली होती. जाहिरातीवर रग्याचा फोटो छापला होता.
जत्रेचे दिस उजाडला, ३ दिस जत्रा चालली, मुलबाळ जत्रेत फिरत होती. पण सर्वांच लक्ष होतं ते कुस्ती नी शर्यती कडे,
गावच्या मंदीरा शेजारच्या मैदानात कुस्तीचा आखाडा तयार केला गेला होता, गावोगावच्या छकड्या आपल्या बैलजौड्र्या घेवून गावात तांबडी माती उधळत आल्या होत्या,तांबडी मातीचे लोळ पार आसमंतात उडाले होते. गावोगावचे मल्ल कुस्तीच्या सामन्यासाठी आले होते.
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा