कंपनी भाग १


 भिवा दगडी पायर्या चढत वर आला. देवालयाला चढायला जश्या मोठ्या दगडी पायर्या असतात, तश्याच पायर्या ह्या वाड्याच्या होत्या, वाडा भव्य आणि देखणा होता. छान आकार देवून कापलेल्या दगडात तो बांधला होता. वाडा वडिलोपार्जित होता. वाड्यात देव माणसंच रहात होती. 

भिवा त्यांचा नोकर , कष्टाने कमावलेल शरीर भारदार मिश्या, उग्र काळा चेहरा अनोळखी लोकांना, त्याला पाहून धडकीच बसे.  आबा साहेबांच्या तालमीत तो लहानाचा मोठा झाला. मोठे मालक, धाकले मालक, आई साहेब ही त्याच्या साठी देव माणसं होती. त्यांच्या प्रत्येक दुख: सुखात तो त्यांच्या बरोबर होता. 

पायर्या चढून आल्यावर ओटीवर बसत, मोठे मालक आलो मी म्हणून भिवाने आवाज दिला, मालकाला भेटायचं असेल तर लांबलचक ओटीवर येवून आवाज द्यायचा, आणि जेवायचं असेल काही घेवून आला असेल तर पाठीमागच्या दारात जावून वहिनी साहेबांना सांगायचा, घरात प्रवेश निषिध्द ही सवय त्यांनी स्वतः हून लावून घेतलेली, त्याच्या आधीच्या पिढीत, ही प्रथा पूर्वपार चालत आलेली, भिवाने ती अजून तशीच जपलेली, आत ओसरीला लागून आलेल्या मोठ्या खोलीत दगडी देवूळ होतं, त्यात शिवाची स्वयंभू पिडींची स्थापना केलेली होती,  व बाजूला गणेशाची मूर्ती ची स्थापना केली होती. म्हणूनच सर्व पथ्ये कडक पाळली जायची, गणेशोत्सव, गणेश जयंती, महाशिवरात्रीला हे देवूळ भाविकांना उघडे केले जाई, गावचे लोक दर्शनाला गर्दी करत, त्यांच्या चहा, महाप्रसादाच्या जेवणाच्या पंगती वाड्यावर होत.वाडा माणसाने भरून जाई, वर्षातून ४वेळा गावकीला वाड्यावर जेवण असे, पण त्या खर्चाचा साधा उल्लेख ही होत नसे. 

 आई साहेबांनी दारात येवून आवाज दिला कोण? भिवा का?काय रे! काय काम काढलं? भिवाने लांबूनच खाली वाकून नमस्कार केला, लाल सुती जरीचा काठ असलेली साडी पदर डोक्यावर, लाल बांगड्या त्यात जाड दोन,हातात दोन पाटल्या,हातात जपमाळ, नाहीतर फूलवातीचा घरचा कापूस हाच पेहराव भिवा वर्षभर आईसाहेबाचा पहात होता.  

वाईच, काम होत मालकाकडे, त्यानां निरोप घेवून आलो होतो, असू दे! असू दे! येईल तो पूजा आटपून एवढ्यात तू बस, आई साहेब बोलल्या. भिवा मालकाची वाट पहात बसला..... 

क्रमशः

वर्षा प्र पाटील. ©®

उरण नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4