तांबडी माती भाग :४
भाग ३ वरून पूढे चालू:
म्हातारीनं कोबंड बांग द्यायच्या आत रग्याला उठवलं रग्या तोंड धुवून यायच्या आत चुलीवर आधण ठेवलं, चहा तयार करून दोन पेल्यात ओतला, म्हातारी भीत भीत बोलली, रग्या कारण नसताना तोंड वेगांळून नोकरांना, पाटलांना बोलू नको. नोकरी गावली ती सोडू नको. रग्याने म्हातारी कडं पाहून म्हातारीला बोलला आता नाय मी तूला लोकांची भांडी घासायला लावाचू . तू काळजीत पडू नग. तशी म्हातारी खूष झाली. रग्याने चहा संपवला नी पाटलाच्या वाड्याचा रस्ता धरला.
संगळ्याकडे शांतता होती. एखाद्या कुत्रा कुठेतरी भुंकत होतं. रस्ता निर्मनुष्य होता. रग्या वाड्यावर पोचला. गोठ्यात बल्बचा पिवळा उजेड फाकत होता. जून्या नोकराने नेमून दिलेल्या कामा प्रमाणे रग्यान कामाला सुरूवात केली. गाई गुरांना चारा घातला. पाण्याच्या बादल्या गुरांना पाजल्या. बादल्या, किटल्या घासल्या, आणि दूध काढायला सुरूवात केली. भरलेल्या किटल्यांची झाकण बंद केली. दोन खोड घेवून छकड्याला जोडले. पहिल्या दिवशी घरचा जूना नोकर ठरलेले रस़्ते दाखवायला, तसेच ठरलेली दुघदधालय दखवायला छकडयात बसला. किटल्या छकड्यात ठेवून बैलांना चुचकारत बाजाराचा रस्ता धरला.
दिग्या बाजारात दूध देवून आलेला पाहून , गड्यान मागच्या दारात रग्याला चहा नी न्याहारी दिली. मळ्यात गेल्या आठ दिसा पासून भाजी खूडली.नव्हती, बायका मळ्यात भाजी खुडायला गेल्या होत्या, भाजी खुडून होईपर्यत रग्यानं गुरं गोठा धुवून कढला परत छकडा जोडला. गड्यान भाजी छकडीत भरली, नी गाडी बाजाराच्या रस्त्यानं धावली, फार दूरवरून धुंगराचां आवाज कानी पडत होता. दररोजची रोजनिशी रग्याची सुरू होती. दिस ़भराभर जात होत. महिना भरत आला. गायी गुरांना रोज व्यवस्थित चारा पानी मिळत व्हता. आता खोडं बी रग्याला ओळखू लागली होती. त्याच चुचकारणं समजून कमी, जास्त वेगात धावत होती. रग्या मालकाची मर्जी राखून होता.
एक दिस भाजीच्या बाजाराला रग्यानं छकडा जोडला, नी पाटील येवून छकडीत बसला, रग्याला कळेना,तो उतरून काही बोलणार! पण मालकांनी त्याला बसायची खूण केली. गाडी भाजी मंडईत उतरवून परतीच्या प्रवासात पाटलांन गाडी एका घराजवळ थांबवली. रग्याला तिथचं थांबवून पाटील उंची हवेलीत शिरला . एक दिड तासानंतर परत येताना पाटील बराच खूष व्हता.पाटलाच्या खूषीचं कारण रग्याला कळेना.?
दूपारच्या जेवायच्या ठिकाणी पाटलांन गड्याला एक खूर्ची आणून ठेवायची व्यवस्था केली. नी पाटील त्या वर स्थानपन्न झाला.
रग्याचा घास हातातच होता, इतक्यात पाटील बोलला....
क्रमश:
वर्षा प्र. पाटील. ©®
उरण नवी मुंबई
9819406813
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा