कंपनी भाग:२


 भाग :१ वरून पूढे चालू

आबासाहेबांना  जावून आता वर्ष होईल, त्यांचा भारदार आवाज, करारी नजर आणि दरारा, ह्यापुढे गावच काय? घरातले देखील घाबरत असत,  कोणतीही चूक करून त्यांच्या पूढे कोणीही जायला धजत नसे, पण न्याय निवाडा सर्वांना पटेल, असा. त्या मुळेच तर घर नी गाव एकसंघ राहिला होता, त्यामानाने आईसाहेब थोड्या मउ पण करारी! एखादी गोष्ट होता कामा नये म्हणजे नाही, पण कुणाचा काही प्रश्न असेल तर अख्ख्या गाव आईसाहेबाकडे धाव घेई. मग आईसाहेब ती बाब आबासाहेबांच्या कानावर घालत, भिवा त्यांचा विश्वासू नोकर ,काही क्लिष्ट बाबतीत, तिसरं मत हव असेल तर गोष्ट भिवाच्या कानी घातली जाई, मग तोही जीवाची पर्वा न करता हवी ती मदत करत असे., इतक्या कडक वातावरणात वाढल्या मुळे मोठे मालक पारच मायाळू, त्यांची कारभारीण मोठ्या वहिनी साहेब तितकीच किंबहूना त्याच्याहून  अधिक मायाळू, त्यामूळे अख्ख्या गावचा राबता दिवसभर वाड्यावर असे. विड्याच्या सूपारीपासून, केळीची पान, पूजेची फूल ,फळ नारळ भाजीपाला हे गावाला वाड्यातूनच मिळे.त्यामूळे वाडा सतत गजबजलेला, आबा साहेब गेले, आणि वाडा रिकामा भासू लागला,. 

डोंगराच्या पायथ्याशी लागून आबासाहेबांची वडिलोपार्जित जमिन, आबासाहेब एकुलते एक वारस, जमिनी बाजूलाच भिलवार वाडी त्या वस्तीच्या टोळीच्या प्रमुखाचा भिवा हा मुलगा बाप जावून १० वर्ष झाली. बापाबरोबर लहानपणापासून तो वाड्यावर राबतोय, त्यामुळे वाड्याची त्याला खडानखडा, माहीती, तेच त्याच देउळ, . . . 

वर्षा प्र पाटील. ©®

उरण, नवी मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4