सोया वेगन शुगर फ्री बर्फी


मीआज थोड्या वेगळ्या विषयावर लिहून परत आपल्याच हेल्दी ह्या विषयाकडे वळणार आहे. वेगन हा असा ग्रुप आहे की ज्यात अंड, मासे, मांस खात नाहीत . पण असाही एक प्रकार त्यात आहे की ज्या लोकांना दुधाची अॅलर्जी आहे. म्हणजेच लँकटोज इनटाँलरन्ट आहेत. जे दुधाचे पदार्थ खात नाहीत. किंवा जनावरांवर अत्याचार होतात ते होवू नयेत. त्यांच्या पाडसांना दूध न मिळता ते बाजारात विकले जाते. असे अन्याय होवू नयेत म्हणून दूध व दूधाचे पदार्थ व्यर्ज करतात. प्राणी प्रेमी असल्याने मी ही तसे सुरू केले होते. म्हणजे सोया मिल्की चहा पिणे वैगरे. पण शेवटी चहाच सोडून दिला, मासे अंडी बंद केले पण दही, साजूक तूप सोडता येईना, मग पूर्ण वेगन बनू शकत नाही. त्यापेक्षा त्यावर अगदी सोपा उपाय म्हणजे आपण गोधन पाळून फक्त थोडसं आपल्या पूरक दूध वापरून बाकी दूध तिच्या बछड्यांना देवू शकतो पण शहरात हे शक्य नाही . आपण भारतातील सव्वाशे कोटी जनता त्यांना दूध व दूध जन्य पदार्थ मिळवण्यासाठी २० कोटी तरी गाई म्हशी आहेत का? हा विचारही आपल्या मनाला कधी शिवत नाही. सकाळी डेअरी वाल्या कडून १ली.दूध मात्र न चुकता घरी आले पाहीजे. भैयाला दुधात भेसळ नको जाड शायीचेच दूध हवे, गाय/म्हैस २० ली. पाणी पिईल. कोंडा चारा खाईल. तेव्हा तेवढ्याच मात्रेत दूध देईल. हे झालं प्राणि प्रेम. पण आपला विचार केला, तर दूधाची चव अतिशय मधूर तृष्णा, भूक भागवणारी,प्रोटीन्स, कँल्शियम, शुगर पुरवणारी. ते घेतले नाही तर कसे? ह्या द्विधा मनस्थितीत आपण कमीत कमी दूध वापरण्यात, म्हणजे लहांनाना आवश्यक आहे. ते त्यांना देण्यात पण जिथे दुधाला आँप्शन म्हणून काही वापरता येत असेल तर... 

ह्या विचारानेच मी वेगन लोक बर्फी खात असतील तर ती कशी ची विचार केला, व मला एक कृती सूची व मी ती अंमलात आणली. 

सोया पनीर वेगन बर्फी ज्यात दूध किंवा दूध जन्य पदार्थ नाहीत( मावा मलई) . पण जर वेगन साठी बनवतात तर डायबिटिज लोकांसाठी का? नको? म्हणून मी शुगर फ्री रेसीपी करून पाहीली. 

मी वेगन नाही. किंवा डायबिटिसज पेशंन्ट ही नाही. पण असे लोक आपल्या आजूबाजूला असतात, त्यांसाठी काहीतरी करणारी जागरूक नागरिक नक्कीच आहे. 

आज पूर्णत:हा मी तयार केलेली रेसीपी

सोया पनीर बर्फी मी मागेच बनवलेली आहे. 

आताची पूर्णत:हा वेगन (दूध जन्य पदार्थ नसलेली)शुगर फ्री रेसीपी

वर्षा प्र. पाटील©®

सोया वेगन शुगर फ्री बर्फी:

Eat Healthy stay Healthy

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4