पिल्लू
रूसलेल्या,
ह्या अबोल पिल्लाला
समजावयाला तू 🏃♀️येशील ना?
गुलाबाच्या, पाकळी सम
नाजूक गालाचा , 🌹
पापा, तू घेशील ना?
ओंथबलेल्या डोळ्यांना,
तू हळूच पुसशील ना?
लाल 🔴लाल नाकाला, .
तू हळूच ओढशील ना?
कुरळ्या कुरळ्या केसांवरून
अलगद हात फिरवशील ना?
मुक्या मुक्या ओठांना👄
तू बोलतं करशील ना?
चंदामामा 🌙दाखवत, तू
घास 🍛भरवशील ना?
तुझ्या ह्या, पाडसाला
हळूच कुशीत घेशील ना?
गोड 🍭गोड आवाजात
अंगाईगीत म्हणशील ना?
सांग ना? आई तू सदा
माझीच रहाशील ना? . ..
वर्षा प्र. पाटील. ©®
उरण नवी मुंबई

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा