तांबडी माती भाग : ७

 


भाग: ६ वरून पूढे चालू

गावोगावच्या अनेक मल्लांनी ह्या सामन्यात भाग घेतला होता. मैदानात वेगवेगळ्या आखाड्यात कुस्तीचे सामने रंगले होते, लोक सभोवताली गोळा होवून त्यांना प्रोत्साहित करत होते. वरचढ होईल त्याच्या नावाने जल्लोष करत होते.  सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत १० फेरे पार पाडले. शेवटची फेरी अटीतटीची होती. त्यात रग्या होताच. अखेर रग्याने आपला प्रतिस्पर्धी तांबड्या मातीत लोळवून. ज्या तांबड्या मातीत रग्या जन्माला, वाढला खेळला आज ती लाल माती रग्या च्या अंगभर चिकटली होती. १० हजाराच ंप्रवेश शुल्कातून ठेवलेल्या बक्षिस रग्या जिंकला होता. तालुकास्तरीय ५० हजाराच गावाच्या नावे ठेवलेल बक्षिस व फिरता चषक पाटलाला मिळाला. १० हजाराच शर्यतीच बक्षिस रग्या च्या खिल्लारी जोडीला मिळालं. अशा तर्हेने बक्षिस समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. 

खिल्लारी बैलांना व छकडीला फुलांच्या माळेने सजवून ढोल ताश्याच्या गजरात मिरवणूक पाटलाच्या वाड्यात आली. पाटलीनीने रग्याला व बैलाला ओवाळले. म्हातारीने दृष्ट काढून भाकरीचा तुकडा ओवाळून फेकला. तिच्या बोळक्यात हसू आणि डोळ्यात आसू आले. ती गर्दीत भान हरपून भूतकाळात शिरली...... 

अशीच पाटलाची मिरवणूक निघाली होती पाटील गावची निवडणूक जिंकला होता. रग्या चा बाप दाम्या निवडणूकीत नाचत होता. पाटलांला उचलून नारे देत होता. अचानक हरलेल्या पार्टीने मिरवणूकीवर हल्ला केला तो वार पाटलांवर होता पण दाम्या मध्ये पडून त्याने स्वत:वर स्विकारला होता. शहराच्या इस्पितळात पोहचेपर्यंत त्याचा मृत्यु झाला होता. गावावर अवकळा पसरली होती. नुकताच मुलाला जन्म दिलेली रग्याची माय तो धक्का सहन करू शकली नाही. आणि आपला पोरगा म्हातारी च्या पदरात टाकून  रग्याला पोरक करून निघून गेली. जाताना पोराचा सांभाळ कर सांगून गेली.... 

आज २० वर्षांनी परत तशीच मिरवणूक निघाली, आई बापाविना पोरका पोरगा गावचा हिरा 💎आणि गावची शान ठरला होता. पाटलाची मान ताठ झाली होती. उर अभिमानाने भरून आला होता. त्याने रग्याची पाठ थोपटली. गावभर जत्रेचे 🎊🎈उत्सव पार पडत होता. 

म्हातारी रग्याचे हात पिवळे केले की मरणाला मोकळी होणार होती. रग्याला नोकरी लागल्यापासून ती गावच्या पोरी डाेळ्याखालून घालत होती. आतातर रग्याचा भाव वधारला होता. 

रग्याला १० हजाराच बक्षिस खूप होतं. झोपडी पाडून त्याला म्हातारी साठी व स्वत:साठी घर बांधायचे होत. घर हे त्याच स्वप्न आता साकार होणार होतं. 

पाटलाला ५० हजाराच अप्रूप नव्हतं त्याला 🐂🐃बैलावर व रग्यावर आणखी मेहनत घ्यायची होती. आता पाटलाच्या डोळ्यासमोर जिल्हास्तरीय कुस्तीचं फड व बैलगाडीची शर्यत जिकंण्याचं स्वप्न तरळून लागलं. 

समाप्त. 

वर्षा प्र. पाटील. ©®

उरण नवी मुंबई. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4