कंपनी भाग:३
त्यांच्याच वस्तीच्या आजूबाजूला भरलेल्या कणसाच्या ठिक्या रचून ठेवलेल्या असायच्या, खळ करून सारवून जागा साफ सुथरी करून ठेवलेली असायची, हे सर्व वस्ती वरच्या बायका दरवर्षी करत, तिथेच बाकड्यावर झोडणी व्हायची,
काय रे भिवा काय एवढ, काम काढले मोठ्या मालकाचा आवाज कानी पडला, आणि विचाराच्या तंद्रीतून भिवा भानावर आला,
ओटीवर ठेवलेल्या आराम खूर्चीत धोतर सांभाळत बसत, मालक , म्हणाले ,
गावातून सरपंच तात्याचा निरोप हाय, तातडीची मिटींग धराला सांगितली सांच्याला,
का? कशासाठी?...
बाजारच्या पोलिसांकडून तूम्हाला रक्षण भी हाय, टेकडी खालची संमधी जमिन सरकार मागतय, कंपनी काढायला, भिवा एका दमात सार बोलला, तूम्हाला निरोप देवून मला परत गावच्या मंडळीला निरोप धाडायला सांगितलंय, सरपंच तात्याने,
पाटलांना थोडी कल्पना होती, पण एवढ्या तातडीची बैठक म्हणजे दप्तरातील कागद आला, असणार, भिवाने प्रश्नार्थक नजरेने मालका कडे बघिलले,
जा, मागल्या दारी पडवीत जा चहा पी, मग गावात निरोप दे, वस्तीवर जाशील तर निरोप देवून लगेच वाड्यावर ये संध्याकाळची बैठकीची नी चहापाण्याची सोय करायला चार माणसं, घेवून ये, तोपर्यंत मी आई साहेबांच्या कानावर ही गोष्ट घालून येतो,
भिवा मागच्या पडवीत गेला.........
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा