तांबडी माती भाग:६
भाग ५ वरून पूढे चालू:
सर्वत्र छावणीचे स्वरूप आले होते. थोड्या थोड्या अंतरावर तंबू ठोकण्यात आले होते. गावच्या मागच्या बाजूच्या समुद्र किनारा च्या मोकळ्या धुळीने भरलेल्या रस्त्यावर शर्यत आयोजीत केली होती. एरवी एकांतवास लाभलेल्या रस्त्यावर शर्यत बघायला अलोट गर्दी जमली होती. आपापल्या गावचे लोक छकड्यावर व हातात आपापल्या गावच्या नावाचे झेंडे घेवून नाचत होते, नारे देत होते. ही सर्व व्यवस्था करताना पाटलाला खूप मेहनत घ्यावी लागली होती. सर्व व्यवस्थेची तयारी करायला लागणारी परवानगी घ्यायला साहेबाच्या घरी(हवेली) भेट द्यावी लागली होती.
पाटलाने फीत कापून शर्यत सुरू करायलाही तोच साहेब मुद्दाम बोलावले होता. त्याच्या हातून फीत कापून शर्यतीचे व कुस्तीचे उद्घाटन करण्यात आले. टाळ्या, शिटी, शीळ ह्या आवाजाने सर्व परीसर दणाणून गेला.
रग्या पांढरे शुभ्र कपडे व तांबडा (लाल )फेटा बांधून रुबाबात छकड्यावर बसला होता. पाटलांनी जवळ येवून जुजबी सूचना दिल्या. रग्याची पाठ थोपटली.
वर्षभर खिल्लारी बैल 🐂🐃 रग्या चा इशार्यआवर नाचत होते. बंदूकीचे ३बार झाले. व शर्यत सुरू झाली. रग्याने बैल चुचकारले. हातातील दोर्या(वेसण) सैल सोडल्या. हलकेच चाबूक पाठीवर फिरवला नी बैल 🐂🐃सुसाट पळू लागले.स्पिकरवर धावते समालोचन सुरू झाले. लोक शिट्या घालू लागले, आरोळ्या ठोकून आपापल्या गावच्या आरोळ्या देवून गाडीवानला उत्साहीत करू लागली.
पाटलाच्या विश्वासाला खिल्लारी बैलांची जोडी खरी उतरली. त्यांची बैलगाडी शर्यतीत पहिली आली रग्याने छकडीतून उडी मारली बैलांना मिठी मारली. त्यांचा पोळ कुरवळला.बैलांच्या तोंडातून फेस येत होता. जीव तोडून धावले होते. त्यांच्या दोन्ही मालकासठी !बैलाच्या मानेवरुन छकडी उतरवून त्यांना पाणी पाजले.
दुसर्या दिवशी कुस्तीचे सामाने होते. मैदानात लाल माती टाकून आखाडा तयार केला होता. उधळलल्या वेळूला धाडसने पकडलेल्या वेळेपासून आजपर्यंत सर्वच्या सर्व गोष्टी रग्या च्या डोळ्यासमोर तरळल्या पहिल्या साहसाची १०० रू ची नोट दररोजचा खुराक आणि पाटलाचा विश्वास सर्व सार्थ ठरवायचे होते.
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा