गुलाबाचेे फूल
तुझे विलोभनीय सौदर्य
कमी होत की काय म्हणून......
तुझा मोहक दरवळ,
तुझ्या अस्तित्वाची
खूण पटवून देतो,
आसमंतात....
त्यातच दवबिंदूना गुफंले
जणू, शिंपल्यातील मोत्याची माळ,
अशी नजाकत पाहण्यास,
मकरंदानेही आमंत्रित केले
भ्रमरास..
सृष्टीलाही तुझे हे लावण्य
कसे जपावे? न समजे!
तिनेही रोवले काट्याला!
मोठ्या दिमाखात!
परि ते राेषास पात्र न होता
होई तीट ती गुलाबास !!!
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा