पूण्यस्मरण

 प्रिय आईस, 

खरं सांगू? आई आणि मुलीच्या नात्याला कसलच बंधन नसतं ,वयाच सूद्धा. नव्वदीच्या पार केलेल्या बाईला आपली ६० वर्षाची मुलगी देखील प्रिय असते. आणि ६० वर्षाच्या मुलीला ही नव्वद वर्षाच्या आईला काही बाही खाउ घालायची इच्छा असते. पण आपलं नात इतक दीर्घायू नव्हत. मी तुझ्या घरी परतून आले, आणि मला वाटलं आपलं नात पूर्वीपेक्षा घट्ट होईल कारण तू जसे सासरी चटके खाल्ले होतेस तसेच मीही खाल्ले. व त्यामुळे च तूझ्या माझ्या नात्याची वीण अधिकच घट्ट झाली. नातीला तू खूप प्रेम लावलेस,तिच्या ताटातील घास खेचून खाणार्यात तिला आपले लाड करणारी एक आजी मिळाली. व ती अश्वस्त झाली.पण नियतीला हे मान्य नव्हते, आमच्याकडून तू जावू नयेस म्हणून तीने सूद्धा तूला शाळेत जाताना अट घातली, पण तू त्या लहानगी चे ऐकले नाहीस.आणि परत परतून आली नाहीस. तू आम्हा दोघींचा आधार होतीस. जे तिच्या ताटातील घास खेचून घेत होते. ते आपला आधार असलेली आजीही खेचून घेतील हे तिला त्या वयातही माहीत होते. म्हणून ती तूला जाण्यापासून आडवत होती. तूझा माझ्यावर ही खूप विश्वास होता. म्हणूनच तू तुझ्या मायेच्या धाग्याने बांधून ठेवलेले घरटे,मी तसेच जोडून ठेवीन, जपून ठेवीन ह्या आशेवर सर्व नातवंड माझी जबाबदारी आहे हे सांगून गेलीस. पण .. दुसर्यांच्या हट्टापुढे ,अज्ञानापूढे,गर्विष्ठ स्वभावापूढे, आडमुठ्या व कमी लेखण्याच्या सवयीपूढे माझे काय❓कुणाचेच चालले नाही. पण त्यामुळे व्हायचेच ते झाले, तूझे ़घरटे मी एकसंध ठेवू शकली नाही, तू देवून गेलेली गर्भ श्रींमतीही माझ्या वाट्याला आलीच नाही. मुळात ती माझ्या वाट्याला येवू नये म्हणूनच सर्वाना प्रयत्न केले. पून्हा आमच्या तोंडून घास काढून गेले. 

मला आठवत; तूझ्या तेराव्या च्या दिवशी पिंडाला कावळा शिवत नव्हता, तेव्हा कुणीतरी वयस्कर आम्हा दोघींना आधी पान वाढून पहा, म्हटलं व काय आश्चर्य कावळा पिंडाला शिवला, तू गेल्यावरही तूला आमची चिंता लागली होती.

 आज ज्या दोघींची तूला काळजी वाटत होती. त्या दोघी परत तू ठेवून गेलेल्या पोरक्या मुलीच आहेत. पण तूझे संस्कार आणि आशिर्वादाने आम्ही जास्तच कणखर बनत चाललोत.

काही वर्षाने तूझ्या नातीने   उज्वल भविष्य कडे वाटचाल सुरू केली आहे., तुझे आशिर्वाद कायम तिच्या पाठीशी राहोत. कारण आर्शिर्वादातही खूप ताकद आहे. तूझ्या सारखी मी मात्र घराचा आधारस्तंभ बनू शकली नाही. सर्वाना एका छताखाली ठेवण्या इतकी मी मोठी नव्हते, पण दुसर्यांच्या कटकारस्थानापूढे माझे प्रयत्न दुबळे पडले, माझ्या चांगुलपणाची नेहमीच हार झाली. ज्या लोकांनी मला छळले त्याच लोकांनी परत येवून माझ सर्वस्व हिरावला पण आमच्या पाठीवर तूझा सारखा हात पडला नाही. 

४डिसेंबरला आम्ही तूझा वाढदिवस खूप आनंदाने साजरा करायचो, आज  १० वर्षाने सूद्धा तूझी कमी आम्हाला सतत जाणवते. तूझा आशिर्वाद हेच आमचे बळ तोच कायम आमच्या पाठीशी राहो.दुसर्यांच्या नजरेत मी कुणीही असो, (मोलकरीण) पण तूझ्या नजरेत असणारी संस्कारीत ,उच्च शिक्षित ,सालस ,मुलगीच मी आहे. तूझी वात्सल्य मूर्ती सतत डोळ्यासमोर येते.तीच आम्हा साठी प्रेरणा देते. 

तुझीच मुलगी. 

वर्षा प्र पाटील. ©®


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4