वरई (उपवासाचा पदार्थ)





 वरई(भगर ) :-

आषाढी व कार्तिकी एकादशी, महाशिवरात्री ह्या  तिन्ही दिवशींचा उपवास हा दोन्ही वेळचे जेवण न घेता करायचा असतो, त्यावेळी खूपच कमी लोक काहीही न खाता उपवास करतात, पण बहुतेक जण उपवासाला चालणारे पदार्थ खावून हे सर्व उपवास करतात, उपवास करताना पित होवू नये असे  पदार्थ खातात, त्या पैकी एक म्हणजे वरीतांदूळ, वरई, भगर ,सामो राईस, किंवा जंगली राईस वनस्पती शास्त्रीय नाव  Proso Milletअशा अनेक नावाने ओळखला जातो.ह्याचे गोड(वरईची खांडवी) व तिखट(वरई भात)असे अनेक पदार्थ करता येतात. 

वरईचे खाण्याचे फायदे :-

१) वरीतांदळांतील प्रथिने तयार ९ आवश्यक आम्ल असतात. त्यामुळे ते पूर्ण प्रथिन आहे. 

२) वरई मध्ये मॅग्नेशियम, जस्त, तांबे, फाँस्फरसअसते, मँगेनीज ही खनीज असतात. 

३) ह्यातील लेसीथीन ह्या घटकांमुळे नर्व्हस सिस्टीम मजबूत होते. 

४) ह्यातील बी6 व बी9 विटामिन मुळे मेंदू सप्तक राहण्यास मदत होते. 

५) ह्यात फायबरचे प्रमाणही चांगले असते,व पचनात हलकी असते. त्यामुळे भूकेच शमन  होते. त्यामुळे आजारी व्यक्तीला आहार म्हणून वापर करतात. ह्यातील इनसाँल्युबल फायबर मुळे अतिरीक्त बाईल(पित्त) तयार होण्याची क्रिया थांबवली जाते. त्यामुळे पित्ताशयातील खड्यांची निर्मिती थांबते. 

६) ह्यात अँन्टीआँक्सीडंट ही मुबलक असतात, त्यामुळे शरीराचे पोषण चांगले होते. 

७) वरई पूर्णत:हा ग्लुटेन फ्री आहे. त्यामुळे ग्लुटेन ची अँलज्री व सिलीयँक डिसीज असणार्यांनी साठी योग्य आहार आहे. 

८) मॅग्नेशियम चे प्रमाण भरपूर असल्याने रक्तातील साखरेवर नियंत्रण राखता येते. 

९) वरई मध्ये कँल्शियम भरपूर असल्याने हाडांचे आरोग्य राखले जाते. 

१०) वरईत फायटीक अँसिड हे केमिकल असते. जे कोलेस्टेरॉल चे नियंत्रण करते. 

११) ह्यात असलेल्या लिगनान(lignan) मुळे स्तनांच्या कर्करोगावर आळा बसतो. 

१२) ह्यातील फाँस्फरस मुळे पेशीची वाढ नीट होते. 

१३) वजन कमी करण्यासाठी वरईचा वापर करतात. 

१४) कफ संतुलीत करते. कफजन्य व्याधीत उत्तम आहार आहे. 

१५) पचन शक्ती कमी झाल्यास वरई उपयुक्त आहे. 


तोटे:

१)अधिक प्रमाणात खाल्ल्यास वात व पित्त वाढते.

२) थायरॉईडचा त्रास असल्यास वरई खाउ नये

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

वरील माहिती संकलीत


वर्षा प्र पाटील. ©®

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4