तांबडी माती भाग: २


 पाटलांन रघ्याला घरी बोलावलं, रघ्या खूष होत मिळालेल बक्षिस पोरात मिरवू लागला, मुलांनी " पार्टी" करून एकच गलका केला. पण रघ्या पटकन भानावर आला. मुलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत, रघ्यान घरचा रस्ता धरला, पैसे म्हातारी च्या हातावर टेकवले, माझा पोर लई हुशार म्हणून म्हातारीने बोट मोडून दृष्ट काढली. महिनाभरात एका कामाचं पैसे गावतात ते त्यांना १तासात तिला मिळवून दिले होते. पण पोराला पाटलाकडून जाव की नाय कळेना तसेच का बोलावले ते बी कळेना? पण लई विचार करून कशाला बोलावलं ते तर कळल बक्षिसी तर देवून झालती शीळ घालत रघ्या पाटलाच्या वाड्यावर गेला, घाबरत घाबरत पायऱ्या चढून वर गेला. कुणीतरी आवाज दिला, काय काम काढलं? मघा पैकी हा नोकर नव्हता, म्हणजे हा घरचा नोकर होता. पाटलांनी बोलावलं होत, रघ्या उतरला, बस वटीवर मालक खाली आलं की कानावर घालतो, १/२तास झाला तरी कोन ही फिरकीना, कुठच्या कुठे आलो असं राघवला झालं, पण आता असचं जायचा निरोप मिळाल्या शिवाय जाता ही येईना, तेवढ्यात मघाचा नोकर आला, मालिक बोलवतात, ये आत म्हणाला रघ्या त्याच्या पाठोपाठ गेला, पाटीलआराम  खूर्चीवर बसल होत. हं काय काम काढलं? तुम्हीच काल बोलावलं व्हत नव्हे का? रघ्या उतरला, पाटलांनी इचार केला, कालचा पोर तू येळू पकडणारा, दाम्याचा(दामोदर) पोर तू! रघ्या न मान हलवली मालकाने हातानेच त्याला स्टूलनर बसायची खूण केली. व पुढे बोलू लागले, हं माझ्याकडे गाई म्हशीचा गोठा, हाय, त्यात तरणाबांड तूझ्यावानी ल ई(खूप) वेळू  हाईता  त्यांना चारापाणी घालायला, शेण गोळा करायला, झाडून साफसूफ करायला गडी पाहीजे , जेवण खाण , करून वरती २००रू पगार मिळेल, बाजाराला गेलास मळ्याला पानी घातलास २४ तास  राबलास , तर ५००रू देईन, रग्याने मानाने होकार दिला. नी कसुनसी हसला. आतापासून कामावर लागायचं माझा जूना गडी ८ दिवसापासून काम सोडून गावाला गेला, म्हणून म्हटलं आपल्या गावातलाच बघुया , रघ्या हसला. 

आता गावच्या पारावर बसून पचांईतीकरणं बंद . रघ्याला थोड वाईट वाटलं पण म्हातारीचा चेहरा समोर आला नी आपला इथ येणं बरोबर हाय इथ काय नशीब निघल ते निघल.... 

क्रमश:

वर्षा पाटील ©®

9819406813

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4