तांबडी माती भाग:१
रघ्या(राघव) गावचा उनाड आई बापा विना पोरका पोरगा जन्मताच मजबूत बांध्याचा केस कुरळे, सावळा रंग उगाचच गावात उनाडक्या करत फिरत असायचा. पारावर पोर गोळा करून उगाचच मुलात मस्त्या लावत फिरायचा, पण तसा त्याचा गावात कुणालाही त्रास नसायचा, मुल स्वत:हून त्याच्या मागे मागे फिरायची, गरजेला ताे गावातल्यांना लहान मोठी मदतच करायचा पण काही कमवायची अक्कल आली नव्हती. तेवढ शहाणपण तो शिकला नव्हता, घरात म्हातारी आजी एकटीच तिनेच रघ्याचा सांभाळ केला. ती चार घरी धुणी भांडी करायची,रघ्यालाही तिची कणव यायची पण काम कसं, कुठ शोधायचं, हे उमजत नसे, कुणी पाण्याच्या चार खेपा आणायला सांगितल्या व त्या मोबदल्यात काही बाही दिलं की रघ्या खूष होवून आजीला द्यायचा, तेवढीच म्हातारीला मदत.
एकदा गावात पाटलाच्या खोड उधळलं,, गावभर पळाला लागलं, पाटलाचे नोकर त्या मागे धावून दमले, पण ते कुणाच्या हाताला लागलं नाही. बाकी कुणाची हिंम्मत ही होईना त्याला पकडायला, रस्त्यात पळापळ सुरू झाली. खोड हाताला लागत नाही, बघितल्यावर पाटीलही रस्त्यावर आला. पाटलांनी हाक घातली रस्त्यातून बाजूला व्हा. पारांपर्यत गावाला नी पाटलांना त्या खोडांना धावडवलं, रघ्या पोरांबरोबर पारावरच बसलं होतं, पाटील नोकरांना म्हणाला "आता कसं पकडायच ह्या 🐂बैलाला लईच धुडगूस घातलया. रघ्यानं, पाटलाच्या बोलणं ऐकले नी म्हणला मी बघतोया हातात गावतोय का? नी तो खोडाच्या मागे धावत गेला, त्याच्या गळ्यातील दावणीला दांडुका मागच्या पायात येत होता. त्यामुळे खोडाला धावताना अडथळा येत होता. रग्याने जमिनीवर झेप घेत जेमतेम पण घट्ट दांडुका पकडला. अडखळत ५-१०फूट अंतर घसरत गेला, पण रघ्या च्या आडदांड शरीराचा भार न पेलून वेळूचा धावण्याचा वेग मंदावला, गावातील लोकांनी लगेच बैलाच्या शिंगात दोर फेकून जोरात ओढले व वेळूला जेरबंद केलं, पाटलांनी रघ्याची पाठ थोपटली. बक्षिसी म्हणून १०० रू ची नोट दिली. रघ्यानं स्वतःचा जीव धोक्यात घालून वेळूला पकडून पाटलाला मदत केली होती. पाटील लयी खूष होता. गाववाल्यांच पण खोडांन लईच नुकसान केलं होत, पण पाटलासमोर बोलायची कुणाची हिम्मत नव्हती......
क्रमश:
वर्षा प्र पाटील. ©®
उरण नवी मुंबई
9819406813
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा