कात भाग(२)31/1/2022

   दररोज आता मंजी (ती) गुरं घेवून कुरणातल्या मैदानात न थांबता दाट जंगलात गूरं सोडून त्या मुलांच्या झोपडी जवळ जावू लागली,  त्यांना  भाकर्या जेवण करून देवू लागली. ती थांबत असे तो पर्यंत  त्या पोरांचा  बाप पलीकडच्या  बाजूला असलेल्या गावात उतरून हव्या त्या वस्तू  आणत असे कारण आता त्याला मुल ंंएकटीच झोपडीत टाकून जायला लागत नव्हते.  एक महीना तिने आपला दररोजचा परिपाठ चालू ठेवला, दवबिंदूत भिजलेलं ओलं कुरण खावून गाई म्हशी भरपूर दूध देवू लागल्या, तशी भावजय  खुश झाली. 

आपल्या मुलांना सांभाळायला, आपला संसार  सावरायला एक बाई मिळते, हा विचार करून त्यांनी मंजीला माझ्या झोपडीत कायम येवून राहशील का?माझ्या दोन लहान मुलांना सांभाळशील का?  विचारले. 

तिच्या मनात हा विचार असला तरी घरी भावाला सांगणे तिला जमण्यासारखे नव्हत तिने दोन दिवसात झोपड्यात रहायला येईन. पण परत कधी मला तोडून गावात जायची वेळ येता कामा नये  सांगितले. आता ती खुश झाली होती. 

तिने घरी जावून पेटारा   खोलला  साड्या काही  आणखी जुने नवे कपडे बेचक्यात बांधले आणि गुरं चरायला घेवून जाताना ती स्वतःच्या वस्तू घेवून जाऊ लागली. आणि बाई नसलेल्या झोपडीत जाण्या आगोदरच ती तिथली मालकीण झाली.. ... ..

शेवटच्या दिवशी तिने सकाळी लवकरच  गायीगुरं  चरायला नेली. दुपारी भाउ,  भावजय झोपलेली अस्ताना ती त्यांना परत गोठ्यात घेवून आली.  तिन लग्नातली  साडी  नेसली. आईने दिलेला  मणी गळ्यात घातला, छान केस बांधून त्यावर अनेक गजरे माळले ,आज आरशात तिने मोठं कुंकू लावले, आणि दबक्या पावलाने ती घराबाहेर पडली. परत डोंगरात जाणार्य रस्त्याला लागली .आज ती कुरणा जवळच्या  मोठ्या झाडाखाली थांबली,  तीने खुणेसाठी ठेवलेला दगड काढला,  माती बाजूला सारून खड्डयातून  पैशाने भरलेला डबा काढला. जास्तीचे गजरे, गौर्या , दूध, सरपण विकून कष्टाचे भावजयच्या नजरेतून वाचवलेले पैसे ती आपल्या नव्या संसारासाठी वापरणार होती. 

रस्ता चालत असताना रानात तसंच कात टाकलेलं चमकदार  शरीर असलेल जनावर सरसरत गेलं तिने त्याला हात जोडले. तिच्या मनात विचार आला, आपणही  असंच जून्या वैराण मोडक्या संसाराची कात टाकून  नविन चमकदार नशीब घेवून चाललो आहोत. ती पूढे चालत राहीली ती झोपडीपाशी  येवून थांबली , आतून नविन कपडे घातलेली मुलं धावत आली. तिने पिशवीतून गोड खाऊ  काढून मुलांच्या हातात दिला, गावच्या बाजारातून  दोन दिवसापूर्वीच तीने आणला होता. होणारा नवरा हातात बाजारातून आणलेली साधीशी पण नविन कोरी साडी घेवून बाहेर आला, तिला साधी(स्वस्त) पण भरजरी साडीत नटलेली पाहून हरखून गेला. चौघ पठारावर असलेल्या देवीच्या देवळात गेले,  दोघांनी विधीवत पूजा केली.  तिने माळून(बनवून) आणलेले हार घातले.  गोड नैवेद्म दाखवला. मग त्याने तिच्या कपाळावर  कुंकू  लावून पहिल्या बायकोच डोरंल तिच्या गळ्यात  घातलं, मुलांनी अक्षता उडवल्या, त्याने प्रसाद तिघांच्या  तोडांत भरवला व तिघांनी प्रसादाचा घास त्याच्या तोंडात भरवून विवाह संपन्न झाला. आनंदाने चौघे घरी गेले. 

आजही मंजी सरपण गोळा करते.रानतील फुलांचे हार गजरे करून देवळाबाहेर विकते. रानातील मोकाट गायी झोपडीच्या बाहेर बांधून त्यांच्यासाठी चारा कापून आणते, तो चारा  त्यांचे दूध,सरपण, गौर्या रानातील, मध, फळे, भाज्या,तळयातील मासे,पुरेसे स्वतःला ठेवून बाकीचे नवरा गावच्या  बाजारात विकतो.चौघसाठी ते भरपूर होते.आधी हे मंजी एकटीच करत असे आता तिला  जोडीदार मिळाला होता. आताही ती कष्ट करते. पण ते तिच्या  संसारासाठी करते. 

एकदा मनाचा  हिय्या  करून मंजी  स्वत: जिथे कुराणात गुरं घेवून येत असे. तिथे गेली. त्याच झाडाखाली  तिचा भाऊ बसला होता. मंजी नंतर आता तो गुंर घेवून येत होता . मंजीने काही बाही घरात शिजवलेलं डब्यात घेवून आली होती, ते भावाला खायला दिलं .भावाला आपली बहीण सुखी व ठिकठाक  पाहुन  गहिवरून आलं,  तिने गायी गुरांना  गोंजारलं, असचं अधून मधून गोडाधोडाचं घरात शिजवलं की मंजी भावासाठी कुरणातल्या मोठ्या झाडाजवळ  घेवून जाई,  भावाकडून तेवढीच गावची खुशाली कळे.गप्पा होतं.अन एक नात टिकून राहिलं. 

आता तिला आपल्या कात टाकलेल्या  संसारात कुणाची  लुडबूड नको होती. तिने दोन्ही  गावच्या वस्तीत जावुन रहायला नकार दिला. रानातीलच वारा तिचा  आपला झाला होता .त्यांचा चौघांचा संसार सुरु झाला होता. 

वर्षा पाटील. ©️®️🌹

12/2/2022

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4