आठवण
भंगलेल्या वास्तूचे रूप पाहून
मला उमजून आले.
आपल्या प्रेमाची साक्षही
आपली साथ सोडू पाहते,
तो वळणा वळणाचा रस्ता
आता डांबरी होवून राहीला
तो झाडावरील कोकीळ
साद घालीनाशी झाला,
खळखळता झराही आता
नाल्यात जमा झाला.
खेळलेले खेळही
आताशी इतिहासजमा झाले.
आंबा बोरीची झाडे
जळिफाट्या मध्ये गेली
आताशी मलाही तुझी
आठवण होवू लागली.
वर्षा पाटील. 🌹©️®️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा