व्यवहार

 पैसा हे व्यवहाराच माध्यम कधीपासून आहे, हे माहीत नाही, पण ते माणसाला इतकं प्रिय झालं की.त्यासाठी लोक माणूसकी,भाउबंदकी विसरून गेले.त्याने जी जी सुख लाभू शकतात ती ती मिळवू लागले. त्यासाठी आपल्या आतल्या आवाजाला दाबून चोर्या,लुटमार,दरोडे घालू लागले. प्रंचड अफरात अफर करू लागले. पैसा हे फक्त व्यवहाराचं साधन आहे हे लोक साफ विसरून गेले.पण काही व्यक्ती इतक्या नीच असतात की ते एखाद्याच्या नशीबातील काढून तिसर्याच कुणाला तरी देतात. ज्यांनी स्वतःच्या कष्टाने, वडिलोपार्जित ,        ( उच्च शिक्षित,व्यापारी डोक्याने एकाजागी बसून कमवतात) स्वत : कमावलेला पैसा त्याला मिळू नये म्हणून हजारो उच्चापात्या करतात. जसं आपल मन आपलं शरीर सुख लोलुप असतं तसं प्रत्येक नश्वर  शरीर उंची कपडे, दागिने, सौर्दयप्रसाधन वापरण्यास इच्छुक असतं. सांगण्याचा मुद्दा ज्याचं त्याच्यापाशी रहावं म्हणून बँक नावाची सुरक्षाव्यवस्था सुरू केली.आता बँकेतही डोक्यात किडे वळवळणारा माणूस नावाचा क्षुद्र प्राणी आपल्याला  नेमून दिलेले काम न करत,आपल्या कामाशी प्रामाणिक न राहता त्यातही भ्रष्टाचार, अफरात अफरी करू लागला. छोटसं उदाहरण दयायच झालं तर..    50 लाखाची गाडी १कोटीचा बंगला नैसर्गिक आपत्ती, वादळी तडाखे पुढे तग धरू शकत नाही.आणि माणसाला असलेला वृथा अभिमान शून्य होवून जातो. कोरोनाने जगाला हेच दाखवून दिलंय निदान मोहापायी दुसर्याच जिवन  उध्वस्त करू नका जिवन हे क्षणभंगूर आहे. चोरी करून उंची कपडे घालण्यापेक्षा,चोर्या करून उंची दागिने वापरण्यापेक्षा, चोर्या करून लाँग ट्रीप एजाँय करण्यापेक्षा  प्रामाणिक पणे जीवन जगा. कारण एखादी अघटीत घटना आपल्या जिवनात घडली की आपल्या डोळ्यासमोर आपण केलेल्या पापाचा घडा उभा राहतो. 

स्वता जगा दुसर्याना जगू द्या.जिवन सुंदर आहे ते फक्त इतराने जगू दिले पाहिजे. 


वर्षा पाटील. ©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4