भुंगा
फुलांचा सुहास सर्वकडे पसरला होता, इकडे तिकडे फुलपाखरे उडत होती, आपल्या आवडत्या फुलांतून मध प्राशन करत होती, अचानक तिथे एक काळा भुंगा आला, सर्वाना तो पाहून त्याची दहशतच वाटली, त्याने सर्व फुलांना दरडावून सांगितले ही फुलांची बाग माझी आहे, तूम्ही, चतुर , टाचणी फुलपाखरे ह्यांना बागेत येण्यास मज्जाव करा, फुलांना तर फुलपाखरे मधमाशीच प्रिय होती, मग त्यांनी तसं करायला नकार दिला त्याचा परिणाम भूंग्यांने त्यांना जर बागेत आलात तर मी तुमचे पंख तोडेन सांगितले आणि भितीने फुलपाखरे व इतर किटक बागेत येण्याचे बंद केले, आता बागेत फक्त लहान मोठे भुंगेच होते, फुलांचा रस पिताना ते त्यांच्या तीक्ष्ण डंखाने फुलांच्या पाकळ्या फाडत, फुलांचा जीव घाबराघुबरा होई पण त्यांना मदत करायला कुणीच नव्हते , अशा वेळी कमळ फूलाने मनाशीच विचार केला, आपणच आपल्याला काहीतरी मदत करायला हवी. एक मोठ्ठा भुंगा मोठ्याशा कमळावर येवून बसला, ते पाहून छोटे छोटे भुंगे ही कमळाच्या इतर फुलांवर बसले व मध प्राशन करू लागले, त्यावर मोठा, भुंगा म्हणाला तुम्ही जर आम्हाला इजा करणार नसाल तर आमचीही तुमच्याशी मैत्री होईल, त्यावर तो काळा भुंगा खूष झाला, त्याने त्याला मी तुमच्या पाकळ्यांना इजा करणार नाही सांगितले, आणि तो भुंगा कमळातच मध पीत राहीला त्याच अनुकरण इतर सर्व भूंग्यांने केले , रात्र झाली प्रत्येक कमळाने आपले दल मिटले, आणि सकाळ होताच, सर्व फूले उमलली, आत प्रत्येक फुलात भुंगा मरून पडला होता, एरव्ही लाकडालाही पोखरणार्य भुंग्याने फुलाच्या पाकळ्यांना इजा केली नव्हती, मध प्राशन केल्याने त्याच्यातील हिंसकता जावून मधातील मधूरता त्यात उतरली होती, पण जर कमळाने दया दाखवून आपले दल बंद केले नसते, तर भुंग्याच्या त्रासापासून स्वताला वाचवू शकले नसते.
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा