31 दरवळ
आता केतकीच्या जाॅबला जवळ जवळ चार वर्ष पूर्ण व्हायला आली होती, आता शहरात चांगल्या ठिकाणी केतकी आशू साठी शाळा, आणि जवळपास जागा शोधत होती. .शोधत असतानाच एक छोट टुमूकदार घर केतकीला आवडलं आणि त्याचा मालक ते चांगल्या किंमतीत द्यायला तयार पण झाला. घराच्या सभोवताली झाडे होती, पूढे मागे अंगण होते.मेन म्हणजे घराला पायर्या चढताच एक काँमन ओटा होता आणि दोन बाजूला दोन प्रवेश द्वार आणि पाठीमागे एक किचन व वरती 1रूम व त्याला धरुन बाल्कनी, केतकीने वरची रुम बेड रुम म्हणून केली त्यात फर्निचर केले, खाली स्टडी रुम व हाँल, शेजारी ,काका काकू व आशू अर्थात आशू लहान असे पर्यत त्यांना ती जागा पुरेशी होती किचन फूल फर्निश करून त्यात डायनिंग हाॅल होता. संध्याकाळचे जेवण सर्व एकत्र करत .केतकीचा बराचसा वेळ फाईल स्टडी करण्यात जाई, व काकूला हाताखाली कामाला बाई ठेवल्यामुळे तीला जेवण खेरीज काम नसे, काका बाजारहाट व गार्डनींग करण्यात वेळ घालवत बाकी उरलेला वेळ तिघंही ज्याला जसा जमेल तसा आशु बरोबर घालवत.
आई बाबा मात्र केतकीच्या वर संशोधनात आपला वेळ घालवत, केतकी मात्र प्रत्येक वेळी नकार देई, आईचे म्हणणे शिक्षणात थोडफार साम्य असेल तर ठीक आहे, तू सर्व सेटल आहेस कमावती आहेस मग काय हवं, तू कुठेतरी हो म्हण, केतकीचा ह्या गोष्टीला ठाम नकार नव्हता, जतिन, राजची बरोबरी करणारा कुणी मिळणार नसला तरी , केतकीच्य हुद्याला धरून असायला हवा आधीच दुखावलेली, त्यात मते जुळून यायला हवीत नाहीतर आता संसारात नसली तरी कामा त मुलीत परिवारात ती सुखी होती. .....
विचार करता करता आठवणींची पाने उलटता उलटता केतकीला केव्हा झोप लागली कळलेच नाही. ..
क्रमशः
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा