23 दरवळ

 आई, बाबा घरी पोहचले, तो पर्यंत  संध्याकाळ होवून गेली होती. आल्या आल्या बांबानी सगळी पत्र केतकीच्च्या हातात  दिली.  केतकीने एक एक पत्र फोडून वाचले, एक एक ग्रिटींग  पाहीले, सर्व पत्रिका पाहिल्या, आणि तिला आपल्याला एकदाही आपल्याच घरी जायची बुद्धी कशी झाली नाही  हे लक्षात आले. ,बहुतेक ग्रिटींग  व पत्र जतिनने पाठवली होती. दिड वर्षांची ताटातूट म्हणजे खूप काही नव्हते,पण केतकीचं आयुष्य पार बदलून गेले.त्याने प्रत्येक पत्रात फोन नंबर,पत्ता लिहीला होता,त्या दिवशी खूप  महत्त्वाचे काम होतं म्हणून  तो आला नव्हता,पण तो तिला फसवण्यासाठी तिला टाळत नव्हता,सर्वात शेवटी तिने लग्न पत्रिका फोडली लग्न 💒 मागच्या महिन्यातील शेवटच्या तारखेला झाले होते,त्यात एक चिठ्ठी लिहीली होती  💒 आमंत्रण समजून ये,मी अक्षता पडे पर्यंत वाट पाहेन,पण यायचे टाळू नकोस,कारण हाच माझ्याकडे शेवटचा उपाय आहे.मी लग्न ठरवले असले तरी तू तिथे पोहचल्यावर तुझ्याशीच लग्न करेन,पण यायचे टाळू नकोस, पण ती वेळ येणारं नाही. पत्रिका हातात लागताच ताबोडतोब फोन कर.तू असशील तिथे मी येईन.परत तिथे फोन नंबर व एक किंमती अंगठी होती.

पत्र वाचून केतकीचे छतावरील पंख्याकडे  ओढणीकडे,औषधांच्या बाटली कडे व निरागस आपल्या सहा महिन्यांच्या मुली कडे लक्ष जात होते.  जतीनचे लग्न होवून एक महीना उलटून गेला होता, आता तिला पिश्चरच्या सीन सारखे मी तूझ्या मुलींची आई आहे तेव्हा तू मला पदरात घे,असं त्यांच्या दारात जावून तिला बोलायचं नव्हतं, रात्रभर तिने उशी भिजवून आपल्या दुःखाला  वाट करून दिली,कुणाला काहीही कळले नाही.परंतू सकाळ झाली तशी ती खंबीर झाली. पुढल्या आठवड्यात तिला ड्युटीवर जाँईन व्हायचे होते.  ती घरातील, कामे, मुलीचा दिवसभरचा सर्वसाधारण तीच्या  खाणाच्या वेळा, झोपणं, पौष्टिक आहार, तिचे घालायचे कपडे  ह्याचा आराखडा तयार करून तशा आईला व काकीला सुचना देवून पुन्हा  एकदा रूजू व्हायच्या आगोदर  सर्व कामाची, अभ्यासाची तयारी केली. ...

क्रमशः

वर्षा पाटील©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4