30 दरवळ
दिवस भराभर निघून जात होते, सर्वांचे जीवनमान असच पूढे सरकत होते, म्हणता म्हणता आशु अडीच वर्षाची झाली आणि केतकीने काँर्टर सोडायचा निर्णय घेतला, तिने आशूला शाळेत घालायचं ठरवलं,आणि तिच्या आई बाबांना नीट काहीतरी निर्णय केतकी कडून हवा होता, केतकीने सर्व गावी ठरवायचे ठरवले, मामा, मामीने गावी आजी आजोबांना भेटायला यायला नकार दिला,
आई, बाबा, मोठे काका, आजी आजोबा, आणि दोन्ही काका काकू केतकी आणि छोटी आशु सारे घरी गावी जमले, आई बाबांनी त्यांच्या स्वताच्या घरी रहायचे ठरवले, ज्या काका काकूंना मुल नव्हते त्यांनी आशूला स्वतःचं नाव देवून घरातल्या घरात दत्तक घ्यायचे ठरवले ,केतकीने नाव बदलले नव्हते, त्यामुळे तीला इतर काही प्रश्न नव्हता घरखर्चाचा प्रश्नच नव्हता। केतकीला चांगली सॅलरी होती, घरचं काका काकूंना उत्पन्न होत
त्यांनी आता ठेकेदारीची कामं पण बंद केलं होतं, आणि ते घरातील मळ्यात मदत करायचे ते केतकी सोबत रहायला तयार झाले. म्हणजे आशू , आता आईच्या देखभाली खाली तयार झाली तरी ती मुलगी म्हणून काका काकूचीं असणार होती, कुणी काही विचारणार नव्हत, तरी सुद्धा उशीरा मुलगी दत्तक घेतली असच होतं
क्रमशः
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा