26 दरवळ

 लंच नंतर गाडी काढून केतकी स्टाफ सहीत जतिनच्या साईटवर गेली. एरव्ही लहान मोठ्या काँट्रॅक्ट साठी फक्त सहकारी  गेले तरी  चालले असते. , पण  कोट्यावधीचे काम असताना नंतर काही झालं तर अडचण नको म्हणून ती स्वतः गेली. काही विपरीत घडू नये, म्हणून ती स्वतः  हजर राहीली, त्यात साँफ्ट काँर्नर  होताच पण स्वताच्या  दृष्टीनेही योग्य होतं, जे काही ती सहन करत होती. त्याला सर्वस्वी तोच जबाबदार  होता. त्यामुळे त्याच्यावर विश्वासून  राहून तीला मुळीच चालणार नव्हतं , यदाकदाचीत परत त्याच्याकडूनच ती अडचणीत येवू शकत होती. ती साईटवर पोहचली. तिथे त्यांच्या स्वागताला जतीनचे इंजिनिअर, व इतर स्टाफ होता, जतिन मात्र नव्हता, त्यामुळे  त्यांना  हवी तशी पडताळणी करता आली, त्यात जागा, मटेरियल, काम कंप्लिट होण्याचा अवधी,  ह्याचा समावेश होता,  एवढ मोठ टेंडर भरलं तो उपस्थित  नाही,, असा शेरा मारून फाईल  पेंडीग म्हणून शेरा मारला, व  असे करत असताना तिने  स्वताची सही व  शिक्का न करता  असिस्टंटला  सही करायला  लावली,  हेतु एवढाच की कोण या पदावर आहे हे कळू नये. ....

चारच दिवसात  भेटण्यास उत्सुक  असण्यार्यांच्या कार्डमध्ये जतिन चं कार्ड होतं, एवढं मोठ टेंडर त्याला  घालवायचं नव्हतं केतकी ने फाईल  चेक ,नो एनी  डाऊटस् फाईल कंप्लिंट & फाईल प्रोसीड, शेरा मारून  सर्व फाईल कंपनीच्या माणसा कडे सपूर्द  केली .  जतीनला फाईल कंपनीकडे सपूर्द झाल्याची प्रत मिळाली व तोही  रिलॅक्स झाला. कलेक्टर  बोर्डवर तत्कालिन कामासाठी आलेल्या मुलीचा बोर्ड  आजून तसाच होता. . 

जतिन आणि केतकीची भेट होता होता टळली,म्हणजेच ती टाळली गेली. केतकीने ती टाळली ,तीला हवं तर ती भेटू शकली असती, अर्थात  फाईल मधे काही हरकत घेण्यासारखे नसल्यामुळे  जतीनला ते काँट्ँक्ट मिळालं. .......

अगदीच नेहमी नाहीत पण मोठ्या contract च्या सँक्शनच्या निमित्ताने  अधून मधून जतिनच्या फाईलस्  कार्यालयात  येत राहील्या .


वर्षा पाटील ©️®️🌹



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4