34 दरवळ

 

  साधारण एक महिन्यांनी शुक्रवारी   अचानक मकरंदच फोन आला, केतकीला येत्या रविवारी संध्याकाळी घरी तूला जेवायला यायचं आहे, नको नको करताना मकरंद ऐकत नाही म्हंटल्यावर केतकीने यायचं कबूल  केलं.....

संध्याकाळी परत छानशी साडी नेसून केतकी मकरंदकडे घरी जायला निघाली रात्रीच्या जेवणासाठी म्हंटल्यावर बरोबर तिने आशूला घेतलं   व फोर व्हीलर काढून एक स्वीट बाँक्स  घेवून व छोटा बुके घेवून त्या अर्धा तासांत पोहचल्या. फ्लँटला खुपच प्रशस्त होता. छान सजवला होता केतकीने दिलेले  झुंबर हाँल मध्ये दिमाखात लावलेलं होतं, आणि ते हाँलची शोभा वाढवत होतं, मकरंदची आई  मकरंदची बायको आणि त्यांची कामवाली किचनमध्ये  जेवणाच्या  तयारीत  होते, मकरंदचे बाबा हाँलमध्येच पुस्तक वाचत बसले होते, केतकी गेल्या गेल्या मकरंद हाँलमध्ये  आला.मकरंदची आई पाणी घेवून आली.केतकी व आशु मकरंदच्या आई बाबाच्या पाया पडली. एवढ्यात मकरंदची बायको नवी नवरी सरबत घेवून आली. कामवाली हळदीकुंकूच तबक व फूल घेवून आली. फुलांचा दरवळ मन प्रसन्न  करून गेला. 

 तिने सासूला केतकीला आणि आशूला  हळदीकुंकू, लावून फुल दिलं, आशूला छोटे छान गोल्ड पेंडटं असलेलं बाँक्स दिलं.केतकीला सोन्याची अंगठी व लग्नाचा आहेर म्हणून  साडी दिली.  केतकीने मकरंदला बुके,  मकरंदच्या आईच्या हातात स्वीट आणि मकरंदच्या बायकोला सोन्याचे टाँप्स दिले. देवाण घेवाण संपली आणि केतकी मकरंदच्या आई बाबां बरोबर गप्पा मारत बसली. तेवढ्यात जतिन आला, तो मुलाला घेवून आला होता, आशुला परत एकदा खेळायला फ्रेंड भेटला, ती परत एकदा त्याच्या बरोबर खेळायला गेली. मकरंद, जतिन, बाबा आणि केतकी अवंतार गप्पा  मारत बसले, आई मकरंदचं बायको  जेवणाची तयारी करायला गेल्या, केतकीने मकरंदला बायकोचे नविन नाव विचारल महीमा, .अक्षरावरून नावच जमत नव्हते. मग काय ठेवलं महिमा त्यांच्या गप्पा चालू असताना मकरंद व बाबा टरेस वर टेबल  लावायला गेले. टेरेस छान फुलांच्या  कुंड्या  सजवून ठेवली होती. त्यावर छोटे छोटे रंगीत बल्ब  सोडले होते,  वरती आकाशात छान तारे चमकत होते., फुलांचा  छान दरवळ पसरला होता. टेबल छान सजवला होतं, मकरंद च्या आईने काही पदार्थ केले होते, काही महीमाने केले होते, काही विकत आणले होते, सर्वजण जेवायला बसले , गप्पा  गोष्टी , करत असताना महीमाने जतिनला विचारलं वहिनी नाही आल्या, त्यावर तो तिला बंर नाही ,म्हणाला, पण तिने घरी तुमच्या लग्नाची पार्टी म्हणून बोलवलंय मी रीतसर अरेंज करून बोलवेन,......

जेवण संपल्यावर जतिनने केतकीला विचारलं कसा वाटला मकरंदचा  फ्लॅट  मी स्वतः  ह्या रो हाऊसचे बांधकाम  केलं, माझ्याच इटेरीअर डेकोरेटरने  सजवला आहे.  , केतकी  म्हणाली अप्रतिम छान मैत्री निभावली, पण दोघांबाबत नाही निभावता आली,  माझ्या बाबतीत जरासा क्रुर वागलास.. 

केतकी  अग असं नको बोलूस मी तूला घरी त्याच साठी बोलावलंय मी तुलाही  छान गिफ्ट देणार आहे, तुझ्या मदतीची कल्पना  आहे मला, मी तूला भेटायचा खूप प्रयत्न  केला, पण तु भेटली नाहीस .. मी तूला पत्र सुद्धा लिहीलं होतं तू लग्नघटीके पर्यत  पोहचली असतीस तर ते लग्न नाकारून  तुझ्याशी लग्न करण्याची तयारी होती माझी. . आमचे रिलेशन नाकारण्या इतपत हिंमत होती माझ्यात माझ्या वडिलांचे उपकार होते त्यांच्यावर  त्यांचे माझ्यावर नव्हते, पण मी भांडू शकलो नाही घरच्यांशी,  तू मला विसरू शकत नव्हतीस, पण दुसरीकडे अडकली सुद्धा होतीस तुलाही बाहेर जायचं होतं,राज गेला नसता तर तू त्याची बायको असतीस ना!तू लग्न का नाही केलं आताही करू शकतेस, आता मात्र केतकीच्या डोळ्यात खळ कन पाणी आलं, तिने वर पाहीलं  आकाशातील चंद्र तीला धुसर दिसत होता, तीच्या डोळ्यात न सामावण्या इतपत पाणी जमा झालं ती म्हणाली  मी राजला त्याची पत्नी बनू शकत नाही, कारण मी तूझ्या बाळाची आशची आई होणार आहे सांगितल्या

वर त्याने मला जर हे फोनवर सांगितलं असतं तर मी इतक्या लांब आलो नसतो, पण तू घाबरलेली आहेस घरातले लग्न तोडू शकत नाहीस तर  मी मामा मामीच्या कानावर घालून तुम्हांला मदत करेन म्हणाला पण तो गेला, तुझ्याशी संपर्क  राहीला नाही, मी धीर करून तूझ्या घरी आली होती पण तुमच्या घरी लग्न जमवण्याचा कार्यक्रम  होता, मी माझा फोन नंबर पत्ता माझा हुद्दा  सर्व देवून आले होते पण तूझा फोन आला नाही. आता जतिनच्या डोळ्या समोर अंधार आला होता.. . 

केतकी सर्वाना बाय करून आशूला घेवून निघून  गेली.  

जतीन ही मुलासह निघाला, तो गाडी इतक्या भरधाव  वेगाने चालवत होता की मुलगा म्हणाला बाबा पार्टी खूप छान होती ना पण तुम्ही एवढ्या वेगाने गाडी का चालवतात? .....


क्रमशः

वर्षा पाटील ©️®️🌹


 

 

 


 

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4