19
जतिन सर्व पाहुण्यांना सोडायला गेट पर्यत आला आणि गार्ड ने त्याच्याकडे केतकीने दिलेले कार्ड दिले, त्याने दुपारपासून नाव लक्षात ठेवूनही आयत्यावेळी तो विसरला, जतिने घाई घाईत त्याने ते पँन्टच्या खिशात कोंबले, व गाडीच्या खिडकीतून बोलताना मध्येच गार्डला पैसे द्यायला खिशातून व्हँलेट बाहेर काढले, त्या च्या नकळत ते कार्ड खाली पडले, लगेच लक्ष गेले असते तर उचलता आले असते, पण वार्याने उडाले, गाडीतल्या पाहुण्याला। बाय बाय करून तो घरी आला, पैशाचे पाकीट काढून सर्व खिसे तपासले अगदी गेटपर्यत जावून रस्त्यावर पडले आहे का पाहिले, जशी केतकी त्याच्या आयुष्यातून दूर गेली होती तसेच ते कार्डही उडून गेले होते, त्याने घड्याळ्यात पाहीले, 5:30 होवून गेले होते, अजून सरकारी कार्यालय बंद व्हायला 1/2 तास होता, तो तसाच गार्डपाशी गेला, ती दिसायला सुंदर होती का विचारले, तिने काय पेहराव घातला होता विचारले, केतकी नेहमी पंजाबी सूट घालते तेव्हा साडीत आलेली नक्कीच केतकी नव्हती तरीही तो थोड्याच वेळात सरकारी कार्यालयात पोहचला बहुतेक सर्व घरी जायच्या तयारीत होते, पण तरीही त्याने एका पिवूनला पकडून एखादी आँफीसर, गेस्ट ,तहसिलदार जिल्हाधिकारी, दुसर्या जिल्हातून, तालुक्यातून कुणी इथे व्हिजिट द्यायला आले होते का विचारले, तिकडे साधा क्लर्क ही आला नव्हता, तसा निश्चिंत मनाने जतिन घरी गेला, कुणीतरी संस्थेतील देणगी मागायला किंवा इतर कामासाठी आले असेल आणि तसेच गेले असेल करून ती गोष्ट जतीन विसरून गेला. . ..
क्रमशः
वर्षा पाटील. ©️®️🌹

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा