24 दरवळ
वेळेवर दारात ठरल्याप्रमाणे गाडी आली .सुट्टीनंतरचा खूप दिवसानी केतकीचा कार्यालयातील पहिला दिवस होता. सौम्य दिसणारी पण भारीपैकी केतकीने साडी नेसली. पर्समध्ये आईने बनवलेला डबा ठेवून घरी आधीच्या काही अभ्यासाला आणलेल्या दुहेरी प्रत असलेल्या फाईल्स घेवून केतकी बाहेर आली, दारात फुललेल्या मोगऱ्याचा गजरा करुन काकू दारातच उभी होती ,तिने केतकीच्या हातावर दही साखर, देवून तिला कुंकू लावून केतकीच्या केसात गजरा माळला, त्याचा दरवळ इतका छान पसरला होता, की केतकीचं मन प्रसन्न होवून गेले, अंगणात आई छोटीला घेवून उभी होती. केतकीने तिच्या गालावर एक पापा घेतला, केतकीचे डोळे पाण्याने भरून आले, केतकी गाडीत जावून बसली, कार्यालयाकडे गाडी भरदाव सुटली.. ..
क्रमशः
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा