25दरवळ
मुलगी, घर, आणि आयुष्यातील घडामोडी बाजूला ठेवून केतकी खुर्ची वर बसली, तात्पुरत्या मुलींनी बरीच काम पूर्ण केली होती. पण तरी बर्याच फायली केतकीची वाट पहात टेबलावर होत्या, नविन काम सुरू करण्याआधी त्या तिला निपटायच्या होत्या, केतकीने बेल मारून लेडी शिपाईला बोलवले, बाहेर डु नाँट डिस्टर्ब चा बोर्ड लावून निदान लंच टाईम पर्यंत कुणालाही आत सोडू नकोस सांगितले, व कामाला सुरूवात केली. एक एक फाईल वेगळी करत ती एका फाईलवरील नावाने अडखळलो. जतिन पटवर्धन, कसली फाईल आसेल ? हातातील पेन खाली ठेवत ..तिने दोन्ही हात एकमेकात गुंफले, आणि हनुवटीवर ठेवले, कित्येक विचार मनात उमटले, ही फाईल अडवून आपण त्याची वैयक्तिक भेट घेवू शकतो,पण मग निदान आणखी एक महीना तरी फाईल तशीच ठेवावी लागेल कारण त्यांच नुकतच लग्न झालेलं त्यामुळे , तो लगेच फाईल न्यायला येणार नव्हता, कामात तिला बेपर्वाई आजिबात आवडत नव्हती, तिने फाईल पहायचा विचार केला, फाईल उघडली खुप मोठ काँट्रॅक्ट सँन्शन करायची ती फाईल होती, तीने पाने चाळुन पाहीली करोडो रुपयांची उलाढाल त्यात होती, त्यामुळे साईट विजीट, लेबर चेकिंग आणि राँ ( RAW material)मटेरियल चेकिंग ही सर्व कामं त्यात असणार होती. तिने ती फाईल बाजुला ठेवली, परत शिपायाला बेल दाबून बोलावले, आज दुपारच्या सर्व कामाचा तपशील मागवला, नविन कामे अजून सुरू झाली नव्हती त्यामुळे लंच नंतर काहीच काम नव्हते, लगेच जतिनच्या साईटवर अर्जट काँल करून दोन तासांत पोहचतो, असा फोन करायला सांगितला, योगायोगाने फोन लागला ,तिथपर्यंत इतर फाईलची कामं केतकीने हातावेगळी केली. सर्वात शेवटी केतकीने बाजूूूला ठेेेवलेली जतिनच्या फाईलची उजळणी करायला घेतली. ..
क्रमशः
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा