15 दरवळ

 


  डॉ. ने थोडं बीपी कमी झालं सांगून प्रेगंन्सी  टेस्ट करून बघीतली, ती।  पाँझीटीव  आली सांगितले,  आणि आईच्या  चेहर्‍याला आठया पडल्या घरी येई पर्यंत  तिने राग कसा बसा दाबून धरला, एवढ्या मोठ्या  समस्येला  कसं तोंड द्यायचं कळेना, घरी आल्यावर आताच मी मामा, मामीला व राजच्या आई बाबांना फोन करते,  म्हणून आई फोन जवळ धावली, पण केतकीने  आईचा हात धरला काही नको  कुणालाही  फोन करायला माझा मी मार्ग  शोधेन, केतकी  म्हणाली, त्यावर आईने अग एवढं धैर्य  कुठून आणलंस? करणारा  जग सोडून निघून गेला, आणि हे कसं निस्तरायच? त्यावर केतकीने आईच्या  तोंडावर हात ठेवला, व काहीही बरळू नकोस, मी माझा प्राँब्लेम सोडवीन म्हणाली.  .  एवढयात फोनची रिंग वाजली, केतकीच्या बाबांचा  फोन होता. आई फोनवर हळू आवाजात बाबांशी  काहीतरी कुजबुजली.

दुसर्‍या  दिवशी दारात बाबा आणि काका हजर!  आईने रात्री नविन छोटं माहेरुन  असतं ते  मंगळसूत्र  ते घालायला दिलं, त्यावर केतकी म्हणाली हे काय भलतंच तू मागे लावते त्यावर आईने  अगं ह ग्रामीण भाग आहे इथे भलती सलती अफवा पसरली तर जिवावर बेतेलं, त्यापेक्षा नवरा बाहेर आहे सांगून राजची माहीती सांगितली की कुणी खर्याखोट्याच्या भानगडीत  पडणार  नाही. व तु अडचणीत न येता निर्धास्त  राहशील केतकीने ते काढून पर्समध्ये ठेवले, ती जतीनशी 

कान्टँक्ट करायचा प्रयत्न करत होती पण फोन नंबर खेरीज तिच्याकडे  काहीही साधन नव्हते, आईने मध्ये अँबोर्शनचा प्रस्ताव ठेवला, पण केतकीने तो साफ नाकारला, तिला फक्त

जतीनशी  काँन्टँक्ट  करायचे होते, पण फोनवर ते शक्य होत नव्हते. आणि  नविन जाँब अभावी तिला तेवढ्या लांब जाणं शक्य नव्हते 

इथे जतिन केतकीला फोन करून कंटाळला रिंग जात होती पण फोन कुणी उचलत नव्हते, अशा वेळी  त्याने वेळात वेळ काढून  तो केतकीच्या घरी आला घराला लाँक होते, शेजारी   विचारले तर महीना झाला घर बंद आहे  जतिन कोण आहे व वैयक्तिक  माहीती कशी द्यायची ह्या विवंचनेत शेजार्यानी ती कामावर परगावी रूजू झाली आहे  हे सांगायला  नकार दिला,  गावाला गेलेत सांगून मोकळे झाले.

ती  इंटरव्ह्यू ला गेली होती तेव्हा नक्कीच  जाँबची माहीती तहसील मध्ये मिळू शकते ह्या  कारणाने तो तिथेही चौकशीला गेला, पण तेथील  अधिकारी नव्हते, क्लर्क ने,  पिवूनने  माहीती द्यायला नकार दिला. तिचे गाव माहीत होते पण नावाशिवाय आणखी माहीती नव्हती तेंव्हा  त्याने तोही मार्ग  निवडला  तिच्या गावी गेला, गावात घर शोधणे कठीण  नव्हते, घर मिळाले पण बंद होते ,एवढ्यात  कुणी तिथे  फिरकले नव्हते, एवढे मोठे घर आणि  त्यात कुणीच कसं नाही?त्याला प्रश्न पडला, पण आजूबाजूला विचारायलाही कुणी नव्हते.  आता  त्याच्याकडे दुसरा कोणताच पर्याय  नव्हता, 

केतकीला  अचानक  मिटींग निमित्ताने शहरात जाण्याची संधी मिळाली, काम आटपून तिने डायव्हरला   गाडी जतिन ज्या अपार्टमेंट मध्ये  रहात होता तिथे वळवली,  त्याच्याही फ्लँटला  लाँक होते, शेजारी विचारले असता ते नविन घरी शिफ्ट झाले, होते, जवळच नविन घर बांधले होते, हवा असल्यास  ते पत्ता देतो म्हणाले होते, पण फोन नंबर मात्र त्यांच्या जवळ नव्हता, केतकी जवळ पुरेसा वेळही  नव्हता आणि  ती ड्युटीवर  होती, ती  धन्यवाद  देवून तिथून निघाली, तिच्या कडे वेळही नव्हता, तिच्या  मनात मकरंद  चा विचार आला, पण त्याचा नंबरही एवढ्या दिवसात तिच्या कडून हरवला होता, व त्याचा पत्ता तिच्याकडे नव्हता,, ती कोमजली, कुठेतरी खूप खोलवर दुखावली, पण ती ज्या हुद्यावर  होती तिथून तीने कणखर व्हायचे ठरवले,, घरी जावून तिने निवांत वेळ स्वतःसाठी काढला ,टेलीफोन डिरेक्टरी  शोधली त्यात नविन नंबर नव्हते, हताश होवून, डॉ च्या  कडे गेली मला अँबोर्शन करायचं आहे म्हणून सांगितल, अपल्या घरात घडलेल्या  गोष्टी  ह्याचा केतकीच्या  मनावर खूप परिणाम झाला होता, त्यामुळे  ती जरा नाजूक झाली होती, अशा वेळी  डाँ ने अँबोर्शन करायला नकार दिला,  पण शहरात  तूम्ही एक प्रयत्न  करू शकता म्हणून सांगितले, परत तिने घरी येवूूून आपल्या डायरीत मकरंदचा फोन नंबर शोधला तिला काँलेजच्या दिवसात होता तो नंबर मिळाला,  पण तो नंबर फोन करूनही कुणी उचलत नव्हतं, आता मात्र ती  आतून तुटली होती.   परत एकदा शहरात जावून डॉ, काय म्हणतात,  ते पाहुया ह्या विचाराने  तिने  सरकारी गाडी काढून  शहरात मँटरनीटी हाँस्पिटल मध्ये जाताना, आईने दिलेले छोटं मंगळसूत्र  घातले, डाँ, भेटली, बाळाची ग्रोथ ज्या वेगाने व्हायला हवी, त्याच वेगने होत असताना,  तूम्ही हा निर्णय  का घेता, असे डॉक्टरांनी  विचारले त्यावर डॉ,रांना आपण  लग्न झालेले नाही, आहोत, व उद्या आपण इथे असताना आपण कलेक्टर आहोत हे ती डाँ .ओळखेल, म्हणून तिने राज आपला नवरा आहे व तो बाहेर असतो ,म्हणून हा निर्णय  घेत होती असं सांगून आभार मानून  निघून गेली. गाडीत बसताना गळ्यातील मंगळसूत्र  परत पर्समध्ये टाकले. . .


क्रमशः 

वर्षा  पाटील ©️®️🌹


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4