27 दरवळ
मुलीचं नाव खंर तर ठेवायचं राहून गेलं होतं, कारण तसं कुणाला काही कळणार नसलं तरी नाव लिहीताना प्रश्न निर्माण होणार होता, मामा, मामी मुलीला पहायच्या निमित्ताने आले आणि आईने निदान मुलीला पाळण्यात घालून काढूया ठरवलं,तसं केतकीला सांगून अनायासे दुसरा दिवस रविवार होता, तिघींच खरेदीला गेल्या असत्या पण प्रत्येकीला काहींन काही गिफ्ट घ्यायचे होते, व त्या साठी सर्वांना केतकी बरोबर हवी होती. शनिवारी आई, काकू, आणि मामी तिघींनी मिळून सर्व तयारी केली. संध्याकाळी केतकी कामावरून आल्यावर सर्वजण गाडीत बसून खरेदीला गेले प्रथम बारश्याच्या सामानाची खरेदी करून नंतर कपड्यांची खरेदी करायला गेले, छोटे छोटे सुंदर असे खूप सारे ड्रेस घेतले, त्यातच driverच्या अधिवासी मुलीसाठी दोन ड्रेस व दागिन्यांचा दुकानातून तिच्यासाठी पैजण घेतले, मामा मामींनी हातातील ब्रेसलेट तर काका काकूंनी आजी आजोबा कडून चेन व स्वताकडून छानसे कानातले घेतले, आई बाबांनी कमरेतली सोन्याची चेन व पैजण घेतले, छोटीला लहान असतानाच खूप सारे दागिने गिफ्ट मिळाले, केतकीने दोन पेडंट घेतले, एक मुलीला व सर्वा घरातल्याकडून छोटया अधिवासी मुलीला, कारण त्यांना तिथे त्यांची सोबत, मदत तर होतीच पण नेहमी रानातून आणलेल्या भाजी पाल्याचे ते पैसे घेत नसत.
पण त्याही पेक्षा तो मुलगा केतकी बरोबरच मोठा होत होता आणि तिच्याच वयाचा होता, मिठाई, आणि फुले खरेदी करून सर्व घरी परतले,
साध असलं तरी बारशाला आईने सर्व तयारी केली, रविवारी सकाळपासून सर्वांची लगबग सुरु झाली. अधिवासी मुलीनी निर्मलने फुलांचे लांबलचक माळा बनवल्या सर्वासाठी गजरे बनवले काकांनी मामांनी मिळून पाळणा सजवला,मामीने व काकीने छान रांगोळी काढली, व केतकीला विचारले काय नाव ठरवलं त्यावर तीने आशीका रांगोळीनेच लिहायला सांगितले त्यावर आईने विचारलं जन्म राशीवरून अ अक्षर आलं पण अर्थाने ही नाव असंच ठेवायचं आहे का त्यावर केतकीने सागितले हो हेच ठेवायच आहे, अर्थानेही मनात म्हणाली तू अशी का? असचं मी मुलीला सतत विचारेन व मुलगी मला मी आशिक पासून झालेली पण तू लपवून ठेवलंस म्हणून मी आशिका आहे सांगेन,तिची तंद्री भंग करत मामा म्हणाले बघ केतकीने मुलीला आतापासून शाळेतही घातले, सरळ सरळ या शिका सांगितले, तसे सर्व अचानक गंभीर झाले, मामालाही आपल्या बोलण्याने तिच्या शाळेत घालतानाचे वडिलांच्या नावाचा प्रश्न निर्माण होईल आणि आपण उगाचच बोललो हे समजले , तेवढ्यात गाडी सोनराला कान टोचायला घेवून आली आणि वातावरण सैल झाले,निर्मलेने ताई माझ्याही मुलांचं ठरवा
आम्हालाही असेच साध बारसं करायचं आहे तुमच्या आवडीचं काहीपण नाव सुचवा,म्हणाली त्यावर केतकीने तिच्या मुलाला नीलकांत नाव सुचवलं दोन्ही मुलांचे कान टोचले, आणि, मुलीला पाळण्यात घातले. . ...
क्रमशः
वर्षा पाटील. ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा