20,दरवळ


 पाडयातील लोकांचा केतकी  कडे पाहण्याचा  त्या केसनंतर  दृष्टिकोन  बदलला, ते नियमीत आपल्याकडे पिकणारी पालेभाजी काही रानातील फळ पाठवू लागले, हळूहळू  त्यांची भिती नाहीशी होवून सर्वजण निसर्गाच्या  सानिध्यात  मिसळून  गेले, केतकीने शहरात जावून डिलीवरी  करायला नकार दिला, तिने तिथल्याच ग्रामीण  रुग्णालयात आपलं नाव नोंदवले,  ती शेवटपर्यंत कामावर रूजू होती, तीने एका सुंदर छोट्या  मुलीला जन्म दिला, सहा महिने तिला भरपगारी सुट्टी  मिळाली, तिला जी रिलीव्हर  मिळाली ती मुलगीच होती,  प्रथम  तीने एकटी रहायला नकार दिला पण केतकीने तिला तुझ्या  नकाराचा अर्थ तूला इथे  अगदीच कुणी ड्युटी  एक्सचेंज  करणारा मिळाला तर ठीक नाहीतर जाँब सोडावा लागेल त्यापेक्षा तू मागच्या असिस्टंट  काँर्टर  मध्ये न राहता आमच्याच काँर्टर  मध्ये रहा तूला घरचं वातावरण, जेवण व सोबतही मिळेल 4-6 महिन्यांचा  तर प्रश्न आहे, तू त्या साठी  जाँब सोडू नकोस,म्हणून विनवले,  तिने ते मान्प  केलं मात्र पाठीमागच्या   काँर्टरमध्येच राहण्याचा  निर्णय  घेतला,  ती सगळ्यात मिसळून गेली. रात्री मात्र आई किंवा काकी तिच्या सोबतीला  जात,  सर्वांना  कामाच्या डयुट्या लागल्या , आणि कामात सहा महिने निघून गेले ,अचानक आई बाबा घरी जायला निघाले, कारण एकदा का केतकी  कामावर रूजू झाली की त्यांना परत घरी जायला मिळणार नव्हते,  म्हणून मग ते एकदा आठ दिवसासाठी घरी जावून परत एकदा गावी जावून  येणार होते, केतकी सोबत काका,  काकी रिलीव्हर  होतीच ...


क्रमशः 

वर्षा पाटील .©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4