16दरवळ


 तिने गाडी परत  जतिनच्या नव्या पत्यावर वळवायला  सांगितली, मध्येच बरोबर असलेली lady peon व driver ला लंच साठी गाडी धाब्यावर थांबवली,  तिथे तुम्ही  सुट्टीच्या दिवशी पण काम करता का विचारले, पण केतकीने हसून त्याचे उत्तर टाळले व तुम्हाला  आजचा extra payment माझ्या payment मधून आवश्यक  मिळेल सांंगितले , त्यावर ती  केतकीकडे पाहून म्हणाली, मॅडम त्यासाठी नाही म्हणत ,तिच्याबरोबर गप्पा मारून केतकी थोडी रिलॅक्स झाली. आज तीने खूप गंभीर होवून काहीतरी निर्णय घेतला होता. गाडी जतिनच्या बंगल्याच्य अलिकडे उभी केली, व दोघांना मी येते एक अर्धा तासात म्हणून  मोठ कंपाऊंड  असलेल्या  फाटकातून आत आली आतल्या लाँनवर  दोन तीन भल्यामोठ्या गाड्या उभ्या  होत्या, बंगला  प्रशस्त  होता, तिथल्या गार्डने अदबीने  केतकीची चौकशी केली, आत पाहुणे होते, व काही फंक्शन होते की नाही माहीत नव्हते पण  तो  आत पाहुन येतो,  म्हणाला व  10 -15 मिनीटे,  गेली तरी आला नाही, तिला  परत फिरावं वाटल तेवढ्यात  तो गार्ड  बाहेर आला, आताच ती पाहुणी मंडळी जेवायला बसलीत तूम्हाला अर्धा ,एक तास तरी वाट पहावी  लागेल,  मीही आत जावून तूमचा निरोप देवू शकलो नाही, तिने अजून 1 तास आणि तेही त्यांच्याकडे  पाहुणे  असताना थांबण तिला सयुक्तिक  वाटलं नाही,  तिने आपलं कार्ड  त्या गार्डपाशी दिलं घरातील  फोन नंबर दिला आपलं नाव सांंगितलं, त्याचा नंबर मिळू शकतो का विचारलं पण त्या गार्डकडे तो  नव्हता, एकतर तो गार्ड  नविन होता, किंवा फाटकापाशी  अशी काही माहीती मिळण्याची  सोय जतिनने  केली नव्हती. ... 

केतकीला एक फोन येण्याची  आशा उत्पन्न  झाली, व ती तिथून  परत फिरली, गाडी सुसाट सुटली नी दमलेली केतकी गार वार्याने झोपेच्या आधीन गेली. ...

क्रमशः 

वर्षा पाटील ©️®️🌹


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4