22 दरवळ
बाबांना दारात शिरतानाच पत्रं,पेटीत बरीच पत्रं,अंक सापडले, अर्थात बरीचशी केतकीची होती, त्यांनी ती एकत्र गोळा केली, त्यात, खूप सार्या लग्न पत्रिकाही होत्या, एक अतिशय सुंदर अशी लग्न पत्रिका होती. ती ,सील केलेली होती. पत्रिका नेहमीच उघडी असते, पण सील केलेल्या पत्रिकेवर पोस्टाने मारलेला शिक्का ही नव्हता , ती कुणीतरी घर बंद म्हणून पत्रपेटीत टाकून गेलेले,असणार! घर सफाई नंतर दोघेही फ्रेश होवून दिवा बत्ती केली.. व रात्ररीच्या जेवणाला लागली सोबत गाडीचालक होता, त्याने केतकीच्या बाबांंना त्याचे स्वताच अंथरूण बाहेर व्हरांड्रयात लावायला सांंगीतले ,त्ययावर केतकीचे बाबा ,म्हणाले आता तुमच्या कडे राहून आम्हीही तुमच्यातलेच झालोत. आपण एकत्र हाँँलमध्ये झोपू. केतकीच्या आईला बेडरूम आहेच. त्ययावर ड्रायवर च्या मनात विचार आला त्या दिवशी आपण इरेला पेटलो असतो तर बाईसाहेब व त्यांच्या घरच्यांवर बाका प्रसंग ओढवला असता, देव माणसं आहेत आणि आपण किती वाईट विचार करत होतो.
5-6 दिवस हवी असणारी, गरजेची बरोबर न्यायची सामानाची बांधाबांध केली, काही गावी न्यायचे सामान घेतले, व सर्व गाडीत भरले, आणि बरोबर सहाव्या दिवशी गाडी गावात गेली भर दुपारी पोहचल्यामुळे घराला कुलूप, पाठीमागे जावून विहिरीवरच्या रहाटाच्या बादलीने तिघांनी हातपाय धुतले ,थंड पाणी प्याले, तेवढ्यात रहाटाचा आवाज ऐकून मळयतून माळी धावत आला, त्याने मालक,मलकीन आलेत म्हटल्यावर धावत शेतात गेला, घाईघाईत चावी घेवून आला, आम्ही सगळे शेतात जातो, ,म्हणून टाळ लावतो, माहीत असलेली लोक मागे येतात, आवाज द्यायला, नविन लोकांची पंचायत होते, पण आपल्याकडे कोण येतं नविन. .जतिनला मात्र माहीत नव्हतं तो तसंच परत गेला होता. 🌹
पोरगा, सून आलीय म्हटंल्यावर सर्व घरी परतले, केतकीचं नोकरी बद्दल कौतुक झालं, पण नेहमीसारखी ती आजीला सांगायला आली नव्हती,
रात्री लवकर जेवणं झाल्यावर सर्व वरीष्ठ एकत्र जमले राज बरोबर लग्न जमल्याची,व नंतरची मुलगी होईपर्यंत चा सर्व गोष्ट कथन केली. कुणालाही जतिन बद्दल काहीही माहीत नव्हते, तो इथे येवून गेला, हयाची पुसटशी कल्पनाही नव्हती. सर्व चिंतेत पडले ,अगदी दुःखी झाले. .. ..
दुसर्या दिवशी दुपारची जेवणे झाली, आणि परतीचा कार्यक्रम सुरू झाला. मळ्यातील भाजी, तांदूळ , इतर जिन्नस गाडीत भरले गेले, सर्वांचा निरोप घेवून गाडी रस्त्याला लागली.
क्रमशः
वर्षा पाटील. ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा