17,दरवळ
सोमवार दिवस उजाडला, आज केतकीला आँफीस मध्ये आदिवासी पाडयतील गार्हाणी ऐकायची होती, ठरल्या प्रमाणे आँफीस मध्ये सर्वाना बोलायची संधी मिळणार होती, प्रत्येकजण आपले गाऱ्हाणे सांगत होते, तिचे असिस्टंट नाव, पत्यासकट , तक्रार टिपून घेत होते, एक एक माणूस पूढे सरकत होता, आणि अचानक एक आदिवासी महिला तिच्या लहान मुलांसह तिथे आली, त्यांच्या वस्तीचा प्रमुख तिच्या प्रियकर त्या वस्ती प्रमुखाचा मुला बरोबर लग्न करू देत नव्हता त्यांच्या जातीतील रितीरिवाजाप्रमाणे तीला लग्ना आधी मुल झाले म्हणून तिला मारायचा प्रयत्न झाला होता. घाबरून तिचे आईवडील तिला तक्रार करायला जिल्हाअधिकारी कार्यालयात आले होते त्या वस्ती प्रमुखाला, त्याच्या मुलाला कार्यालयात. बोलवून घेतले, त्याने कार्यालयाबाहेर त्याची प्रचंड काठ्या हत्यार घेवून शक्ती प्रदर्शन करायला व दबाव आणायला माणसं घेवून आला, वातावरणात तणाव निर्माण झाला, पोलिस फौज लावायला लागली, सर्वांच लक्ष केतकी आता कसा निर्णय घेते, ह्या कडे लागलं, आधी तिने फक्त मुलीचं म्हणणं ऐकून घेतलं, मुलीचं नाव निर्मल होतं, व मुलाच नाव कमलकांंत ,तिच्या म्हणण्यानुसार तिचं मुल हे वस्ती प्रमुखाच्य मुलांचं होतं व तिला लग्न करून त्याच्या बरोबरच रहायचं होतं,, तिच्या आईवडिलांना जर लग्न पळून किंवा मुलाला जबरदस्तीने करायला लावलं तर मुलीच्या जिवावर बेतण्याचा संभव होता, त्याच्या घरातील लोकांच म्हणण त्या मुलीच मुल लग्नाआगोदर झालेलं आहे, त्यामुळे ती आमच्या घरात नको, सर्वात शेवटी त्या मुलाला बोलवलं त्याला मुलीबरोबरच संसार करायचा होता, पण त्याची घरच्यांन विरूद्ध /त्याच्या पाड्यतील लोकांविरूद्ध तो जाऊ शकत नव्हता, त्याला मुलीसाठी तू पाड्याच्या बाहेर तू जाऊ शकतोस का विचारले, मुलांना थोडावेळ विचार करून म्हणाला मी बापा विरुद्ध गेलो तर ते मला जाती बाहेर काढतील व नंतर माझ्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल, त्यावर त्याच्या व मुलीच्या आई वडिलांना एकत्र बोलवून सांगितले, की जर दोघं पळून गेले तर तुम्ही काय कराल ?त्यवर मुलाच्या लोकांनी लगेच हिंसक वळण घेतले, परत जमाव शांत करून सांगितले की मुलगा व मुलगी सज्ञान आहेत तेव्हा त्यांच लग्न कायद्याने होईल, व मुलीच्या फिर्यादीने तुमच्या प्रमुखाला शिक्षा होईल ते टाळण्यासाठी तूम्ही तुमचा होकार कळवा पाड्यातील लोकांनी ते मान्य केलं पण मुलाच्या वडिलांनी त्यांना घरात घ्यायला नकार दिला. केस संपली लोक घरी परतली, केतकीने मुलाला व आदिवासी मुलीला थांबवून ठेवलं, मुलाला घरच्या गाडीवर ड्रायवर म्हणून कामावर ठेवलं व त्याच्या रोजंदारीचा प्रश सोडवला, मुलीला आई व काकीला घरकामात हातभार लावण्यासाठी बोलवलं रहायला जागा नसेल तर आपल्या काँर्टर मागे असलेल्या नोकरांच्या जागेत सोय केली, पण त्याची वेळ आली नाही कलेक्टर बाईनी आपल्या मुला व सुनेला घरी नोकरी दिली म्हंटल्यावर त्याचे वडिल नरमले व त्याने दोघांत लग्न करून स्वताच्या घरी ठेवण्याचे आश्वासन दिले,
सभा संपली केतकीच्या मनावरचा ताण सैल झाला, तिने पर्स मधले मंगळसूत्र गळ्यात घातले परत न उतरवण्यासाठी ते राज किंवा जतिनच्या नावाचे नव्हते, माणुसकीला काळिमा फासणार्या रिवाजा पासून रक्षण करण्यासाठी होते, उद्या तिच्यावरही समाज दगडफेक करणार होता, तिलाही असेच तोंड द्यायचे होते, पण तिचा प्रश्न तिला सोडवता येत नव्हता, आज त्या मुलीला मिळाली ती मदत तिला मिळाली नव्हती.
आठवडा निघून गेला जतिनचा फोन आला नाही, एका रात्री आई आणि काकीने विचारलं राजचं मुल तू लग्न न करता एकटीने वाढवायचा निर्णय का घेतलास ,तू अँबोर्शनचा निर्णय ही घेवू शकली असतीस, त्यावर ती कसं सांगणार होती मला राज पेक्षाही जास्त आवडणाऱ्या मुलाबरोबर संसार करायचा होता, हे मुल राजचं नाही, जतीनच आहे पण हे केतकी सांगू शकली नाही, । त्याच्याकडे आई वडिलांना पाठवायलाही तिने मागे पूढे पाहिलं नसतं पण त्या दिवशी त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांचा चपलात माँड हाय हिल्सच्या सँडल होत्या व केतकीने त्या गार्डला विचारले होते कोणी मुलगी दाखवायचा कार्यक्रम वगेरे आहे का तेव्हा तो गार्ड म्हणाला बहुतेक असेल कारण त्यांच्याकडे ती मुलगी खूपदा येते. ..
आई आणि काकी राजच्या गैरसमजात आहेत ते तसंच ठेवू दिलं, आपल्या सारख्या सुंदर मुलीला कोणी तरी फसवलं हे आईला सहन होणार नाही, म्हणूनच तिने ते सांगितलं नाही जर जतिन भेटून लग्न करायचा निर्णय झाला असता तर मात्र तिने सर्वांना सांगितलं असतं.. .
क्रमशः
वर्षा पाटील ©️®️🌹

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा