21 दरवळ
आई, बाबा घरी पोहचले, खुप सारा झाडांंच्या पानांचा पाला दारात पडला होता. आईला उगीचच भरून आलं, वाटलंसूद्धा नव्हतं गावाहून इथे, आणि इथून तिकडे आदिवासी गावात जाऊ, खरंतर केतकी च लग्न झाल्यावर गावी जावून निवांत सासरच्या भल्यामोठ्या घरात रहायचं होतं, केतकी एक वर्षाची असेल, केतकीचे बाबा नोकरी निमित्त एकटेच बाहेर ह्य गावात रहात होते,अचानक त्यांना कुणीतरी कमी किंमतीत ही जागा आँफर केली, रेडी पझेशनचं घरं, तशी घरची सुबत्ता त्यामुळे पगार जो काही स्वतःपुरता खर्च होई, तेवढाच. .मग काय बाबांची(आजोंबांची) परमिशन काढून घेतलं घर . आणि माझी रवानगी भरल्या घरातून ह्या छोटा, पण स्वताच्या घरात झाली, त्या नंतर, मग सणवार सुट्टी अशाच वेळी सासरी जाणं होई. फार फार 1 महिना ह्या घरांत दार बंद रहात असे, आता जवळ जवळ सव्वा वर्ष हे घर बंद होतं.
तसं केतकीला चार काका, मोठ्या काकांनी लग्नच केलं नाही, पण त्यांनी आजोबांनं साथ देत व्यवस्थित व्यवस्थापन केलं, प्रत्येकाला घरात स्वताची जागा ,एकत्र कुटुंब असून सर्वाना स्वतंत्रता,,सर्वासाठी एकत्र चर्चेसाठी,गपा मारायला, हाँल , घरातील दुध, धान्य, भाजीपाल्याचा व्यवसाय ह्यावर अख्ख घर चालायचं, दुसरे काका केतकीच्या बाबांसारखेच नोकरी करायचे तिसरे काका ग्रामपंचायतीचे सर्व ठेकेदारीची( contract) काम घेत असे.पैसा,सुबता सर्व होतं, पण मुल नव्हतं, चौथे केतकीचे बाबा त्यांना दूर शहरातील नोकरी ते इथे 20 वर्ष स्थाईक झालेले, दुसर्या काकाला एक मुलगी, केतकी घरातील सर्वात छोटी मुलगी म्हणून तिचं खुप धाम धुमीत लग्न करायचं होतं, राज बरोबर लग्न असतं तर हे घर आठ दिवस माणसांनी गजबजून गेलं असतं, शांत पाण्यावर वार्याच्या झुळूकेने येणारा तरंग किती छान दिसतो, पण त्याच पाण्यात एखादा मोठा दगड टाकला तर पाण्यातील तरंगाची लय तुटते, व ते शांत होण्यास खूप अवधी जावा लागतो,केतकी बाबत घडलं त्याने सारं घर हेलावून गेलं, सर्व अघटीतच घडलं.
बाबांनी दार उघडून केतकीच्या आईला आवाज दिला, आणि केतकीची आई भानावर आली ,तिने घरात सामान ठेवून बाहेरचं अंगण साफ करायला घेतलं, तर बाबांनी घरातील जळमटे साफ करायला घेतली.
क्रक्रमंश
ववर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा