18 दरवळ


 अशा घटनांचा बोभाटा होत नाही, तसचं त्या दूरच्या ठिकाणीच  लपवून ठेवल्या जातात, कारण चुकांना क्षमा नसते, आणि समाज लवकर रियाक्ट होतो, 

जतिनचा विषय घरात निघणं शक्य नव्हतं, त्याच लग्न घरातील दबावामुळे, त्याला contract  दिल्याच्या कारणामुळे  जमले असेल हे ठिक पण तरीही तिने दिलेलं कार्ड ,  सांगितले नाव हे लक्षात ठेवून तरी त्याने फोन करायला हवा होता.  जस जसे दिवस जात होते तसे काका, काकी, आई, बाबा ह्यांच टेन्शन वाढू लागलं अशातच केतकीच्या नकळत एक दिवस आईने  मामाला फोन करून बोलावंल,केतकी कार्यालयात होती, तेव्हा मामा ,मामी आले,मामा नाखूष होता, दुपारचं जेवण झालं आणि आईने त्याला सगळा वृतांत कथन केला, तेव्हा मामा खूपच नमला,  कारण जाणारा गेला, आपल्या मुलीच जिवन उध्वस्त करून गेला, त्यावर उपाय असचं तिला कुणी स्वीकारणारा मिळाला तर तेही तिच्या तेवढ्याच जोडीचा हवा, मामाला आईने म्हणूनच राजच्या घरी सांगू नका कारण आपल्या नातवाच्या ओढीने ते सतत येत राहतील आणि केतकीला संसार बसवणं शक्य होणार नाही.  मामा विचारमग्न  झाला, संध्याकाळी  निघणार होता, ते कँन्सल  करून  केतकीला भेटायला थांबला केतकी सर्वांशी नाँर्मल  वागली, सहाजिकच ती सौम्य  पध्दती ने वागली,  राग कुणावरही काढण्यात काही अर्थ नव्हता , कारण सगळे  गैरसमजाचे बळी पडले होते, आणि सत्य फक्त तिच जाणून होती,  ते तिच्या साठी योग्य होतं, नाहीतर ती  समाजात ताठ मानेने वावरू शकली नसती. घरांतल्यांनी राज निदान तीची डिलीव्हरी  होईपर्यंत तरी जिंवत  असल्यााचा पण तो बाहेर असल्याच्या नाटकाला  साथ दिली होती. 

 वर्षा पाटील ©️®️🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4