विदुषी
मे आय कम इन विदुषी ने बाँसला विचारलं ,तिच्या बाँसने कशी होती कालची मिटींग? शाल्मलीला विचारले, ती ह्या प्रश्नाने थोडी गोंधळली, पण नंतर छानच होती सर म्हणाली, ती आँफीस तर्फे होती की पर्सनल लेवलला होती? आता शाल्मलीला बाँसच्या बोलण्यातील मेख कळली, तिने उत्तर द्यायचं टाळलं ती काही बोलत नाही पाहून तूम्ही असे नका हो वागत जाऊ ह्या वाक्याने शाल्मलीचा धीर सूटला आपल्या वागण्याने बाँसला खूप त्रास झालाय हे तिला कळलं, काल तूम्ही ज्या क्लायंटला भेटायला गेलात त्याने मला फोन करून सांगितले की तुम्हाला मोठे मोठे काँन्ट़क्ट कसे मिळतात ते आता आम्हाला कळलेलं आहे मोठी गिफ्ट्स आणि सुंदर लेडी पाठवून ती मिळवता, आता तू मला सांग हा धंदा मी कधी पासून सुरू केला? ही नाचक्की एका मोठ्या माणसांकडून झालीय आणि ह्यात कंपनीही बदनाम होते. शाल्मलीला काय बोलायचे ते कळेना? तिने स्वाँरी सर म्हणाली. माझ्या वैयक्तिक मिटींगमध्ये आपल्या कंपनीचं काम पण होतं का पहात होती. त्या साठी मी कंपनीची गाडी वापरली नाही. बाकीचे़ विचारले तू इतक्या मोठ्या माणसाला पर्सनल लेवलला कशी भेटायला गेलीस? त्याने आपले डील रिजेक्ट केलं पण 2रा चान्स देईन सांगितले. तशी पण मी म्हणूनच टॅक्सी करून गेले, नाही जर डील सँन्शन झालं असतं तर तूम्हाला ते कंपनी कडून मिळालं असतं आणि नाही झालं तरीही मिळेलच, त्यावर शाल्मलीला थोडा राग आला, करोडो रुपयांचा मध्ये बाँस हजार रूपायाच बिल मी तूम्हाला देईन म्हणतो हा तिचा अपमान होता. तीला बाँसने विचारले, 50-60 करोडचं काँन्ट़क्ट जो माणुस देतो, त्याला तुझं 50-60हजारंच गिफ्ट कवडी मोलाच आहे. ते देवून तू त्याला जिंकणार आहेस का? शाल्मली निरुत्तर झाली.
बाँसने विचारलं मी दुसरी मुलगी पाठवून बघू का? पण त्यात दोन रिस्क आहेत. दुसर्या वेळेला रिजेक्ट केलं तर एवढं मोठ काँट्रॅक्ट जाईल. अणि जर असिस्टंट बरोबरची मिटींग सक्सेस झाली तर तुझी किंमत कमी होईल. ती वेळ मी येवू देणार नाही. आजच्या मिटींगच काय? आजची मिटींग बहुतेक कँन्सल आहे. ती मीटींग मी उद्यावर टाकते. उद्या डायरेक्ट मी मीटिंगला जाँईन होईल. पण आजची मीटिंगला तू जाणार नव्हतीस ती परवीन बरोबर आहे. मी तिच्याशी बोलून पहाते, पण जर तिने नाही ऐकलं तर मग मात्र तूम्हाला तिला रिक्वेस्ट करावी लागेल, उद्या माझं काम आटपून आल्यावर शाहीन परवेझ ह्यांच्या मिटींग विषयी ठरवू म्हणजे मी तसं माझ मत सांगेन. बाँसचे आभार मानून शाल्मली केबिन बाहेर आली. तासभर तरी ती बाँसबरोबर बोलत होती. ती थोडी डिस्टर्ब झाली. त्यापेक्षा दुखावली श्श्श्श्रीमंत माणसांचे मुड ओळखणं त्यांचे नखरे झेलणं, ह्या गोष्टीचा शाल्मलीला विलक्षण तिटकारा होता. ती बाहेर येवून परवीनच्या केबिन मध्ये जावून तिच्याकडे आजची मिटींग मागून घेतली. ती लगेच तयार झाली कारण तिला एक वेडिंग अटेंड करायला जायचं होतं तिने त्या बदल्यात उद्याची सुट्टी मागितली आणि ती सँक्शन सुद्धा झाली. शाल्मलीने भलत्याच मिटींगमध्ये इन्टरेस्ट दाखवला म्हणून परवीनने आश्चर्य व्यक्त केले.
तीने आजच्या मिटींगची फाईल काढून अभ्यास केला. साधारण 5-6कोटीच काँट्रॅक्ट असेल लाखात कंपनीचा फायदा हे काँट्रॅक्ट सुद्धा तसं छोटं नव्हतं, तीने एक खाजगीत फोन करून मग तीने कंपनीच्या मॅनेजरला फोन लावला, आजची मिटींग काही महत्वाच्या कामासाठी कँन्सल करून उद्या ठरवली आहे सांगून कंपनीचा जो कुणी रिप्रेझेटेटीव्ह असेल त्याला मी तसं कळवते. फक्त तुम्हाला इनफाँर्म करते सांगितलं लगेचच उदया भेटणाऱ्या रिप्रेझेटेटीव्ह मुलाला तिने फोन करून अँड्स व टायमिंग सांगून टेबल नंबर दिला. ह्या संपूर्ण कामात चार वाजले, तिला आपल्या डब्यातील सँन्डविच आठवले, तिने वाँश घेवून डब्यातील सँन्डविच खाल्ले आणि पर्स घेतली व आँफीस सोडले....
क्रमशः
वर्षा पाटील. ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा