जत्रा 28/12/2021

 सकाळी  रमाकांत  लवकर उठला, दात चूळ भरून आईने दिलेला चहा प्याला, आईला म्हणाला  आताच पाउस संपलाय मागच्या खोलीत छान उन येतंय,तिथलं एक कौल काढून  मी घरात स्वच्छ सुर्यप्रकाश आणतो,  अगदीच अनायासे आला पाउस तर मेनकापड लावतो, पण ती खोली मला एकट्याला पा हीजे, माझ, सामान आणि माझं काम मी तिथेच बसून करणार आणि  आपली  तिन्ही खोकी घेवून मागच्या खोलीत गेला.वर कौलावर  चढून एक कौल काढले तिथे तात्पुरते मेनकापड लावले. आणि खाली उतरून खोलीत  ती खोकी उघडून छोट्या छोट्या  धारदार ब्लेड ने तो तासंन तास काम करू लागला. त्याला जेवणाचीही शुद्ध नसे आई काही  जेवण ,खोलीत घेवून येई  ते संपवून तो परत कामाला लागे खोली अस्ताव्यस्त तर झालीच होती, पण आईला तो जीव लावून मेहनत करत आहे एवढेच ठावूक होते. आई कडे त्याने दिनदर्शिका  मागवून घेतली त्यावर खूप सार्या खुणा  केल्या.आणि परत आपल्याच खोलीत अडकवले.आईन म्हटले  अरे! मला लागत तिथी बघायला,  त्यावर अग मला विचार मी सांगेन पण मला किती दिवसात काम पूर्ण  करायच  ते ठरवायला  हवं. सतत दिनदर्शिका  बघून मला माझा कामाचा वेग वाढवता येईल.....

क्रमशः (३)

वर्षा पाटील ©®🌹 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4