जत्रा 28/jan/2022
रमांकान्त वडिलांना कामात मदत करीनासा झाला. आणि वडिलांना त्याची कमतरता भासू लागली. त्यांना कामाचा ताण जाणवू लागला नी आपण मुलाला उगाचच बोल लावत होतो, ह्याची त्यांना जाणीव झाली. जसजसे दिवस पालटू लागले तसतसा रमाकांतचा कामाचा जोश वाढू लागला. त्यांने आपले काम पूर्ण केले, आणि आईला म्हणाला जर माझ नशीब जोरावर असेल तर मला चांगला मार्ग मिळेल आई म्हणाली माझा आशिर्वाद आहे तुझ्या पाशी. पण मला सांग किती पैशात सामान आणले हे कारण तूझ्या पाकिटात फार फार हजार दोन हजार असतील, तो म्हणाला मी कालच बँकेत असलेले पैसे, (रू15000/- )आणले, पण गुंतवणूक करू की नको ह्यावर एकमत होत नव्हतं आईचा तोडांचा 'आ' तसाच राहिला .इतक्य पैशात हे हा काय घेवून आलाय आणि कुठे संपवणार वडिलांची चिंता रास्त होती असं वाटू लागलं, पण मुलाला आपल्या चेहर्यावरचे भाव कळू नयेत म्हणून पदर तोंडावर ठेवून हसू आवरत म्हणाली एवढे पैसे कसे कधी वसूल करणार, तेव्हा रमाकांत म्हणाला फक्त तुझा आशिर्वाद आणि माझा विश्वास काय चमत्कार करतो पाहूयात.
त्याने नीटपणे आपले सामान खोक्यात भरले. व आईला म्हणाला येत्या त्रिपुरी पौर्णिमेला मला दोन दिवस बाहेर जायचं आहे, मी आदल्या रात्री निघेन, आईने दिनदर्शिकेत पाहीलं दोन दिवसातच त्रिपुरी पौर्णिमा होती.
क्रमशः (४)
वर्षा पाटील©®🌹
खूप छान
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवा