कुंतल

 आपण जन्मला येतो, तेव्हा अजाण असतो, नियतीने कोणत्या घरात आपल्याला  जन्म  दिला  तेही ठावूक नसतं,  पण कळत्या वयाचे व्हायला लागल्यावर आपल्याला  आपलं घर आवडू लागतं जे आपल्या आजोबांनी, बाबांनी बांधलेलं असतं

मीही आशाच कोकणातल्या कौलारू घरात जन्म घेतला, आणि समजायला लागल्यापासून आपल्या घरावर प्रेम करू लागले, घरासभोवताली प्रचंड जागा पानाफुलांफळांनी डवरलेले वृक्ष  त्यामुळे  जन्मताच निसर्गाशी संवाद. अशात माझे आई वडिल शेतात  काम करायला जायचे नी मी शाळेतून  घरी आले की आजी जवळ असायचे, दिवसभर आजीच्या भेटीला जेवढी माणसं येत त्यांच्याशी आजीचा संवाद घडे ते शाळा आई वडिल भावंड या व्यतिरिक्त  मला ज्ञान देणारे भंडार होते. 

दुपारी बारा  पासून संध्याकाळी   सहा पर्यंत ही माणसं येत त्यात भाडयंना कलई करणारा, त्याची बायको,  एखादं शेमडं मुल आणि एक भल मोठ बोचकं भर उन्हात येणारा माणूस ओट्यावर/पहल्या पायरीवर बसणार आजील बोलावून तांब्याभर पाणी घटाघटा पिणार , मग तिच्यामागे लागून भल्यामोठ्या  पेटीतून पितळी भांडी  काढायला लावणार मग दिवाळी आली म्हणून मोठाले करंडे ,डबे, टोप ,कलई करायला काढायला लावणार ....

आईने सारवलेल्या अंगणात एक खड्डा खणणार  मग त्यावर एक छोटस  मशीन  ठेवून त्यात आग  लावणार,  आणि स्वतःच्या  बोचक्यातून मोठा काईलचा  तुकडा ,नवसागर पावडर फुंकणी काढणार आणि सर्व भांडी चांदीसारखी  चमकवणार, अंगणात  सर्वत्र  नवसागरचा धूर पसरणार आजी  तिथेच बसून त्यांच्याशी  गप्पा मारणार त्यांचे मळकट कपडे आणि बोलीभाषा  ह्यावरून ते कुठून येत ते मला ठावूक नसे,  पण दोन तास तरी ते भांड्याला कलई लावत मी तिथेच अंगणात खेळत बसे,  आजीचा व्यवहारावरून कधीच वाद होत नसे. ती त्यांना कधी जेवण कधी कपडे असे काहीबाही देई. माझ्या आईला मात्रं  ती लोक तितकीशी आवडत  नसत मी माझी  आई खूपदा घरातच स्वताच्या भांड्याला कलई करताना पाहीली आहे. ती लोक मुलं पळवतात  त्यांच्याजवळ गप्पा मारायच्या  नाहीत हे मला सांगून ठेवलेले असे, पण आजी मात्र नातेवाईक असल्या सारखी त्यांच्याशी गप्पा  मारत असे,  मला मात्र त्या  जास्त कळत नसत. 

क्रमशः 

वर्षा पाटील ©®🌹

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भाग 3 भटकंती: माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .

भटकंती माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर

भटकंती,माझ्याच गावचा द्रोणागिरी डोंगर .भाग 4